Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : अफसाना खानच्या वर्तनावर सलमान भडकला, म्हणाला ..तर मी तुला आता शोमधून काढून टाकले असते

बी टाऊन
Updated Oct 16, 2021 | 15:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस 15 च्या दुसऱ्या वीकेंडची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागच्या आठवड्यात सलमान खानने प्रतिक सहजपालचा क्लास घेतला होता. आता या आठवड्यात गायिका अफसाना खान निशाण्यावर असेल.

 Bigg Boss 15 Weekend Ka Vaar: Salman gets angry over Afsana Khan's behavior, says..so I would have removed you from the show now
Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : अफसाना खानच्या वर्तनावर सलमान भडकला, म्हणाला ..तर मी तुला आता शोमधून काढून टाकले असते ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस 15 WKV सलमान खानने अफसाना खानला मारहाण झापले
  • अफसानाने शमिता शेट्टीसाठी 'म्हातारी स्त्री', 'घर बैठने का समय है तेरा' आणि 'घाटिया औरत' सारखे शब्द वापरले.
  • बिग बॉस 15 मध्ये सलमान खान करणार अफसानाला सर्वांसमोर उघड 

मुंबई  : 'बिग बॉस 15 वीकेंड का वर' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरा वीकेंड का वार शनिवार 16 ऑक्टोबर रोजी प्रसारित होईल आणि चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या आठवड्यात, होस्ट सलमान खानने प्रतिक सहजपालचा क्लास घेतला होता. आता या आठवक्ड्यात गायक अफसाना खान निशाण्यावर आहे.

बिग बॉस 15 मध्ये अफसाना आता सलमानच्या रडारवर आली आहे. शमिता शेट्टीवर अफसाना खानने केलेल्या एज शेमिंग आणि बॉडी शेमिंग कमेंट्सवर जोरदार टीका करण्यास  बिग बाॅस होस्ट सलमान खान  तयार आहे.

प्रोमो व्हिडोओमध्ये सलमान खान अफसानावर इतका रागावला आहे की तो तिला सुपरस्टार ऑफ द सीझन ही पदवी दिली. शोमध्ये सलमान शमितासाठी वापरलेल्या शब्दांची पुनरोच्चार केला. सलमान सर्वांसमोर सांगतो की, अफसानाने बॉलिवूड अभिनेत्री शमितासाठी 'बुढ़ी औरत', 'घर बैठने का टाइम है तेरा' आणि 'घटिया औरत'   असे शब्द वापरले.

बिग बॉस -15 चा समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान अफसानाला विचारत आहे की ती कोणाचे कैरेक्टर ठरवणारी आहे तरी कोण? प्रत्युत्तरादाखल अफसाना म्हणाली की आप बड़े है... आणि सलमानने ते नाही म्हणत तिला थांबवले नहीं, नहीं, मैं बुढ़ा हूं'। …  त्या वेळी अफसानाने स्वतःचा बचाव केला की, ती रागाच्या भरात बोलली. त्यावर सलमानने तिला विचारले की ती रागात असताना काही करू शकते का? सलमान खान यावेळी अफसाना खानच्या सेट पॅटर्नबद्दलही बोलणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी