Karan Singh Grover - Bipasha Basu Expecting First Child : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. हे कपल अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघे 2015 मध्ये अलोन या हॉरर चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. 2016 मध्ये, करण आणि बिपाशाने त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बिपाशा आणि करणच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. दोघेही याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करू शकतात. या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की करण आणि बिपाशा पालक होण्यासाठी खूप आनंदी आणि खूप उत्सुक आहेत.
अधिक वाचा : गुणकारी कढीपत्ता...पाहा हे 5 अद्भूत फायदे
बिपाशाने त्यांच्या लग्नाच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त करणसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने स्वतःचा आणि करणचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. दोघांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. दाम्पत्य त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.
अधिक वाचा : कंडक्टरने नाकारले १० रुपयाचे नाणे, तब्बल बसला 'एवढा' दंड
बिपाशापूर्वी करणने अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न केवळ 10 महिने टिकले. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत करणने जेनिफर आणि त्याच्या लग्नाबद्दल खुलेपणाने सांगितले. जेनिफरशी लग्न करणे ही त्याची सर्वात मोठी चूक होती, असे तो म्हणाला होता. त्यामुळे हे लग्न फार काळ टिकले नाही. आता जेनिफर आणि करण दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. वर्क फ्रंटवर, करण अलीकडेच सुरभी ज्योतीसोबत 'कुबूल है 2.0' या वेब सीरिजमध्ये दिसला. त्याचवेळी बिपाशा क्राइम थ्रिलर मिनी सीरीज 'डेंजरस'मध्ये दिसली होती.