मुंबई: स्टुडंट ऑफ दी ईयर २(Student of The Year 2) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये(Bollywood) पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारिया(Tara Sutaria) सध्याच्या घडीची बॉलिवूडमधील फॅशनेबल अभिनेत्री आहे. तिचा फॅशन सेन्स(fashion sense) हा पाहण्यासारखा असतो. तिचे फॅशनेबल आऊटफिट हे नेहमीच चर्चेत असतात. तसेच ती आपल्या चाहत्यांना फॅशनबद्दल अनेक टिप्सही देत असते.
तारा नेहमीच सोशल मीडियावर आपले विविध फोटो अपलोड करत असते. तिचा चार्मिंग लूक हा साऱ्यांनाच घायाळ करणारा असतो. ताराचा आज २५वा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करतील.
या ब्लॅक गाऊनमध्ये तर तारा सुतारिया एकदम हॉट दिसत आहे. जणू काही हॉलिवूडची हिरोईन असल्याचे दिसत आहे. तिने या फोटोत काळ्या रंगाचा सिंड्रेला गाऊन विथ थाय हाय स्लिट घातला आहे. यावर तिने ब्लॅक आणि सिल्व्हर रंगाच्या पॉईंटेड हील्स घातल्या आहेत. यात तिने न्यूड मेकअप केाला असून फक्त चमक असलेले काळे कानातले घातले आहे. यावेळी तिने आपली हेअरस्टाईल स्लीक ठेवली आहे.
स्टुडंट ऑफ दी ईयर २ या डेब्यू सिनेमानंतरच्या फोटोशूटमध्ये ताराचा अंदाज एकदच हॉट दिसत आहे. ताराने विविध रंगाचा मिरर ड्रेस विथ थाय हाय स्लिट घातला आहे. यावेळी तिने आपले केस एका बाजूला वळवले आहेत. तसेच चोकर नेकलेस यावेळी घातला आहे. मेकअपमध्ये तिने स्मोकी आईज, थोडेसे हायलायटर आणि न्यूड लिपस्टिक वापरली आहे.
याचवेळी झालेल्या फोटोशूटमध्ये ताराने एम्ब्रॉयडरी असलेला फ्लोर लेन्थ थाय हाय स्लिट गाऊन घातला आहे. यातील तिचा ब्लाऊज हा डीप नेक असून बेल स्लीव्हज आहेत. एथनिक लूकसोबत तिने याला वेस्टर्न टच दिला आहे.
कॉफी विथ करणच्या सीझन ६मध्ये तारा सुतारिया आली होती. यावेळी तिचा लूक फारच भन्नाट होता. यात तिने रोझ गोल्ड बॉडीकॉन ड्रेस घातला होता. यात पुढच्या बाजूला नॉट बांधली होती. यावेळी तिने ग्लिटरी मेकअप केला होता. यावेळी तिने एकही ज्वेलरी घातली नव्हती. तिने आपल्या केसांना मिडल पार्टिंग करण्यासोबत व्हॉल्यूम दिला होता.
ताराचा हा ब्लॅक गाऊनमधील फोटो पाहिल्यास तुम्ही म्हणाल ही डिस्ने प्रिन्सेसच आहे की काय? यात तिने थाय हाय स्लिट ब्लॅक गाऊन घातला आहे. यात तिने प्लेन काळ्या रंगाच्या हील्स घातल्या आहेत. तिने आपले केस व्हेवी ठेवले आहेत तसेच डायमंड नेकलेस आणि ब्रेसलेट घातले आहे.