Deepika Padukone Net Worth: पठाण(Pathan)चित्रपटातील(movie)भगवी बिकिनीमुळे (Saffron bikini) चर्चेत असलेली बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. दीपिका आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत दीपिकाने आपल्या मेहनतीने एक वेगळी ओळख बनवली आहे. (Birthday of Deepika Padukone Net Worth,Upcoming Movie List,Childhood, Wedding Dress)
अधिक वाचा : राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या लग्नातील वऱ्हाडींना विषबाधा
दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे तिला एक बॅडमिंटन खेळाडू बनवू पाहत होते. परंतु दीपिकाने मॉडलिंग आणि अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय तिने योग्य ठरवत दीपिकाने आपल्या कारकिर्दीत 52 पुरस्कार मिळवलेत. दीपिकाने 'ओम शांती ओम' या चित्रपटातून पर्दापण केलं होतं. या चित्रपटात तिला शाहरुख खानची अभिनेत्री करावं असा सल्ला मलायका अरोराने फराह खानला दिला होता.
अधिक वाचा : विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केली लघवी
दीपिकाचा हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता, त्यानंतर दीपिकाने एकपेक्षा एक सरस भूमिका करत प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूश केलं. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या जीवनातील काही खास किस्से आणि तिची नेट वर्थ जाणून घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाची एका महिन्याची कमाई सुमारे 2 कोटी आहे, म्हणजे संपूर्ण वर्षाची कमाई सुमारे 24 कोटी आहे.
अनेकांच्या हृदयावर आपल्या अदाने घाव करणारी दीपिकामध्ये आधी आत्मविश्वासच नव्हता. या आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तिला लहानपणी मित्र-मैत्रिणी बनवता आले नाहीत.
दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू होते. तर आजोबा रमेश म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव होते. अशा परिस्थितीत आपल्या मुलीनेही मोठे होऊन प्रसिद्ध बॅडमिंटनपटू व्हावे, अशी प्रकाश यांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेसाठी दीपिका आवड नसतानाही रोज बॅडमिंटनचा सराव करायची.
यादरम्यान दीपिका अनेक राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत होती. भाग होती, तर तिने काही वर्षे बेसबॉलचा खेळही खेळला आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, तिला रोज पहाटे 5 वाजता उठून बॅडमिंटनच्या सरावासाठी आणि नंतर शाळेत जावे लागत होते. दहावी असतात तिला कळलं की ती फक्त वडीलांच्या दबावाखाली बॅडमिंटन खेळत आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा : उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचा महिला आयोगावर हल्लाबोल
दीपिकाचे वडील प्रकाश हे सेलिब्रिटी होते, त्यामुळे इंडस्ट्रीशी संबंधित अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी येत असतं. 2000 साली आमिर खान दीपिकाच्या घरी लंचसाठी खास पाहुणा म्हणून पोहोचला होता. त्यावेळी दीपिका फक्त 13 वर्षांची होती. आमिर हा दीपिकासमोर बसून दही भात खात होता आणि दीपिकाला खूप भूक लागली होती. परंतु तिला जेवण मिळालं नाही. कारण आमिरने तिला जेवण दिले नाही, यामुळे ती न जेवता उपाशीच बसली होती.
दीपिका पदुकोणने नावासोबतच इंडस्ट्रीत खूप पैसा कमावला आहे. यामुळेच आज त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाकडे पती रणवीर सिंगपेक्षा जास्त संपत्ती आहे. चला जाणून घेऊया दीपिका पदुकोण एका चित्रपटासाठी किती फी घेते आणि तिच्याकडे किती कोटींची मालमत्ता आहे.
रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण प्रत्येक चित्रपटासाठी मोठी रक्कम घेते. ती चित्रपटसृष्टीतील उच्च मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन घेते. चित्रपटांव्यतिरिक्त दीपिका अॅडमधूनही भरपूर कमाई करते.
रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण या ब्रँडच्या जाहिरातीसाठी 7 ते 10 कोटी रुपये फी आकारते. तसेच, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून एंडोर्समेंटसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये घेते. याशिवाय दीपिका पदुकोणचे मुंबईत एक आलिशान घर आहे ज्याची किंमत कोट्यवधी आहे.
दीपिका पदुकोणचे मुंबईत स्वतःचे आलिशान घर आहे. त्याची एकूण किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय तिने नुकतेच पती रणवीर सिंगसोबत आणखी एक आलिशान घर खरेदी केले आहे. ज्याची एकूण किंमत 21 कोटी आहे.
दीपिकाच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes Maybach, Audi A8, Audi Q7 आणि BMW 5 सारख्या अनेक महागड्या ब्रँडच्या कारचा समावेश आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. दुसरीकडे, मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिची एकूण संपत्ती 300 कोटींहून अधिक आहे.
दीपिकाची संपत्ती पती रणवीर सिंगपेक्षा कितीतरी जास्त आहे. दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 300 कोटींच्या आसपास आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंगची एकूण संपत्ती जवळपास 271 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.