VIDEO : 'कधी देशासाठी..कधी स्वतःसाठी..आता भाला ब्लँक पँथरसाठी'...नीरज चोप्रा बनला योद्धा

Black Panther Teaser: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा मार्वल स्टुडिओच्या ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हरच्या नवीन टिझरमध्ये दिसला. शुक्रवारी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये नीरज पूर्णपणे योद्धा लूकमध्ये दिसला होता. 46 सेकंदाच्या व्हिडिओच्या सुरुवातीला नीरज भाला घेऊन धावताना दिसत आहे.

Black Panther 2: Golden Boy Neeraj Chopra bags Hollywood project, joins hands with Black Panther
VIDEO : 'कधी देशासाठी..कधी स्वतःसाठी..यावेळी भाला ब्लँक पँथरसाठी'...नीरज चोप्रा बनला योद्धा   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ब्लॅक पँथर - वाकांडा फॉरएव्हर टीचर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
  • टीझरमध्ये नीरज चोप्रा दिसला
  • भारताच्या गोल्डन बॉयचा योद्धा लूकमध्ये

Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची लोकप्रियता आज एखाद्या सेलिब्रिटीएवढी आहे. ऑलिम्पिकमधील सुवर्ण यशानंतर तो अनेक जाहिराती चित्रपटांमध्ये दिसला, मात्र आता तो रुपेरी पडद्यावर चमकण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. मार्वल स्टुडिओच्या 'ब्लँक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' या चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राची पूर्णपणे वेगळी शैली पाहायला मिळत आहे. हातात भाला घेऊन तो योद्ध्यासारखा धावताना दिसतो. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला मल्टीपल्समध्ये दिसणार आहे. (Black Panther 2: Golden Boy Neeraj Chopra bags Hollywood project, joins hands with Black Panther)

अधिक वाचा : Kapil Sharma show : 'द कपिल शर्मा शो'मध्ये विक्की कौशलबद्दल कतरिना कैफ म्हणाली असं काही, Video viral

मार्व्हल इंडियाने शुक्रवारी ब्लँक पँथर: वाकांडा फॉरएव्हरचा टीझर पोस्ट केला आणि लिहिले, '‘भाले की उड़ान मिली भाले की ताकत से…चॅंपियन मीट्स द चैंपियन. द ब्लॅक पँथर. 46 सेकंदाच्या व्हिडिओच्या सुरुवातीला नीरज भाला घेऊन धावताना दिसत आहे. नीरजनेही हा टीझर स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले आहे की, खेळ असो वा युद्ध, तो जिंकेल, ज्याचे लक्ष्य कधीही चुकत नाही. कधी देशासाठी... कधी स्वतःसाठी... यावेळी मी ब्लॅक पँथरसाठी भाला उचलला आहे.

समोर आलेल्या चित्रपटाच्या टीचरमध्ये 24 वर्षीय नीरज काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतो आणि तो भाला फेकताना दाखवला जातो, जो नंतर बाण बनतो आणि त्यानंतर चित्रपटातील पात्र थेट समोर येतात. ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर हा 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॅक पँथर चित्रपटाचा सिक्वेल आहे. टीझरमध्ये नीरजची जबरदस्त झलक नक्कीच दाखवण्यात आली आहे पण तो या चित्रपटात कोणती भूमिका साकारत आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अधिक वाचा : Bigg Boss 16: "हा कोणत्या गोष्टीचा Attitude ", सलमान खानने घेतली अंकित गुप्ताची शाळा

हे वर्ष नीरजसाठी आतापर्यंत चांगले गेले. त्याने यंदाच्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. त्याचवेळी त्याने डायमंड लीग फायनल जिंकून हंगाम संपवला.दुखापतीमुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी