[PHOTO] मलायकाचा जबरा बोल्ड लूक, मात्र ट्रोलिंग सुरुच!

अभिनेत्री मलायका अरोरा हिने केलेल्या एका बोल्ड फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पाहा मलायकाचा हा नवा लूक  

bold photoshoot of actress malaika arora started trolling on social media after photoshoot
[PHOTO] मलायकाचा जबरा बोल्ड लूक, मात्र ट्रोलिंग सुरुच!  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने नुकतंच हे फोटोशूट केलं आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. मलायकाचं हे फोटोशूट खूपच बोल्ड आहे. ज्यावरुन तिला अनेकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. एका काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये मलायकाने हे फोटो शूट केलं आहे. याचेच फोटो तिने आपल्या अधिकृत इंस्ट्राग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

याशिवाय, मलायका आपला फिटनेस आणि ग्लॅमरस लूक यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. आपल्या हॉट अदांनी ती आज देखील आपल्या चाहत्यांना घायाळ करते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. जैसलमेर येथून आपल्या मित्राच्या बर्थडे पार्टीहून मलायका मुंबईला परतत होती. यावेळी तिची बहीण अमृता अरोरा देखील तिच्यासोबत होती.

मलायकाला ट्रोल करणं हे काही पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधी तिला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. कधी तिला तिच्या आऊटफिटवरुन तर कधी लव्ह लाइफवरुन यूजर्सने तिला ट्रोल केलं आहे. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन मलायका तिला जे हवं तेच करत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. त्यामुळे ट्रोलिंगचा फारसा परिणाम ती स्वत:वर होऊ देत नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stand tall n bold .... don’t stoop

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे मागील अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे सुट्टी एन्जॉय करतानाचे किंवा पार्टीतले अनेक फोटो आतापर्यंत समोर आले आहेत. सध्या अशीही चर्चा आहे की, अर्जुन कपूर लवकरच मलायकासोबत लग्न करु शकतो. सोशल मीडियावर त्यांना अनेकदा यावरुन देखील ट्रोलर्सचा सामना करावा लागतो.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलायकाने अर्जुन कपूरचं बरंच कौतुक देखील केलं होतं. 'आम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. मात्र, अर्जुन एक चांगला फोटोग्राफर आहे. त्याच्या मते मी अत्यंत वाईट फोटोग्राफर आहे.  तो पैशांची फार उधळपट्टी करतो हे मला आवडत नाही. पैसे कशा पद्धतीने सांभाळून ठेवावे हे त्याने शिकले पाहिजे. पण अर्जुन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.'

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या जोडीची बॉलीवुडमध्ये नेहमी चर्चा असते, त्यांच्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे हे दोघं टॉप कपल म्हणून प्रचंड लोकप्रिय आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी