Anusha Dandekar: फरहान अख्तरच्या मेहुणीचे बोल्ड फोटोशूट, काचेच्या बॅकड्रॉपवर केले टॉपलेस फोटोशूट

बी टाऊन
Updated May 23, 2022 | 14:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anusha Dandekar Bold photoshoot: अनुषा दांडेकरचा एक्स बॉयफ्रेण्ड करण कुंद्रा बिग बॉस 15 मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता त्यावेळी अनुषा प्रकाशझोतात आली होती. बिग बॉसमध्ये तेजस्वी प्रकाशसोबत करणची जवळीक वाढली आणि अनुषा चर्चेत आली. या जोडप्याच्या ब्रेकअपबद्दल सर्वजण बोलू लागले.

Bold photoshoot of Farhan Akhtar's sister-in-law, topless photoshoot done on glass backdrop
फरहान अख्तरच्या मेहुणीचे बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अनुषा दांडेकरचे टॉपलेस बोल्ड फोटोशूट
  • अनुषा दांडेकरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • अनुषा दांडेकरचे कॉस्मेटिक ब्रँडसाठी फोटोशूट

Anusha Dandekar Topless Photoshoot : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. फरहानने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्याचबरोबर लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. 
त्याचवेळी, फरहानच्या लग्नात सर्वांच्या नजरा फक्त त्याच्या वधूवरच नाही तर त्याच्या मेहुणीवरही होत्या. शिबानीप्रमाणेच तिची बहीण अनुषाही खूपच सुंदर आहे. अनुषा ही एक प्रसिद्ध व्हीजे आणि अभिनेत्री आहे. अनुषा तिच्या बोल्डनेसमुळे अनेकदा चर्चेत असते. प्रोफेशनल लाइफसोबतच ती सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, पुन्हा एकदा अनुषाच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांनाच थक्क केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अनुषा दांडेकरने नुकतेच एक लेटेस्ट फोटोशूट केले आहे. तिने हे फोटोशूट एका कॉस्मेटिक ब्रँडसाठी केले आहे. या फोटोशूटमध्ये अनुषा पूर्णपणे टॉपलेस फोटोशूट करताना दिसत आहे. तिने स्वतःला समोरच्या बाजूने मोठ्या गोल टोपीने झाकले आहे. त्याचवेळी अनुषा काचेच्या बॅकड्रॉपवर पोज देताना दिसत आहे. यावेळी तिच्या हेअरस्टाइलबद्दल सांगायचे तर तिने उंच पोनी बांधला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

यादरम्यान अनुषा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत आहे. अनुषाचे हे टॉपलेस फोटोशूट तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. यावर तिच्या चाहत्यांनी खूपच कमेंट्स केल्या आहेत. दुसरीकडे, चाहते तिला ट्रोलही करत आहेत आणि तू नेहमी कपड्यांशिवाय फोटोशूट का करते असेही चाहते तिला विचारत आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी