Sara Ali Khan: सारा अली खानने परिधान केला एवढा स्वस्त ड्रेस, किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! 

बी टाऊन
Updated May 09, 2019 | 11:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sara Ali Khan dress: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही अनेकदा महागड्या कपड्यांमध्ये दिसून येते. पण नुकतंच साराने एक खूपच स्वस्त असा ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

SARA ali khan_instagram
सारा अलीच्या 'या' ड्र्रेसची किंमत फक्त...   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमची चर्चेत असते. मग ती चर्चा तिच्या सिनेमाची असो वा तिच्या स्टाइलची. अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि पतौडी कुटुंबीयातील अभिनेत्री सारा ही आपल्या फॅन्शन स्टेटमेंटसाठी देखील प्रसिद्ध आहे. सारा अली खान ही नेहमी दुसऱ्या सेलिब्रिटींप्रमाणे डिझायनर आणि महागडे कपडे वापरताना अनेकदा दिसून येते. पण, काही दिवसांपूर्वीच तिने जो ड्रेस परिधान केला होता त्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. 

सारा सध्या मुंबईतच आहे. त्याचवेळी ती तिच्या मुंबईतील घराबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. यानंतर तिच्या एका गाऊनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. साराने निळ्या रंगाचा टील गाऊन परिधान केला होता. साराच्या गाऊनवर ऑरेंज रंगाची प्रिंट देखील आहे. या ड्रेससोबतच साराने ऑरेंज रंगाचे वेगळे शूजही घातले होते. आपल्या या लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी साराने हातात बांगड्या देखील त्याच रंगाच्या घातल्या होत्या. तर आपली हेअरस्टाईल देखील साधी पण आकर्षक अशी केली होती. याच वेळी साराचं हास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होतं. या लूकमध्ये  सारा खूपच सुंदर दिसत होती. 

 

 

 

 

जर आपण साराप्रमाणेच लूक कॅरी करण्याचा विचार करत असाल तर ते अगदीच सोपं आहे. कारण साराने जे ड्रेस परिधान केला होता त्याची किंमत फक्त २४९९ रुपये एवढी आहे. जे आपल्यासाठी योग्य बजेटमध्ये आहे. जर आपल्याला सारा सारखा लूक हवा असेल तर आपणही हा ड्रेस खरेदी करू शकता. साराने परिधान केलेला हा गाऊन 'ग्लोबल देसी'चा आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच करीना कपूरने देखील असाच स्वस्त ड्रेस परिधान केला होता. करीना आपला मुलगा तैमूर अली खानच्या अॅन्युएल फंक्शनमध्ये गेली होती. यावेळी तिने जो ड्रेस परिधान केला होता तो H&M ब्रॅण्डचा होता. त्याची किंमत ही फक्त १४९९ रुपये एवढीच आहे. 

 

 

सारा अली खानने मागील वर्षी केदारनाथ या सिनेमातून सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. यानंतर सारा ही अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सिम्बा' या सिनेमात झळकली होती. सध्या सारा ही इम्तियाज अली याच्या 'लव्ह आजकल २' या सिनेमात काम करत आहे. ज्यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. तर त्यानंतर सारा वरुण धवनसोबत कुली नंबर १ सिनेमात देखील दिसेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Sara Ali Khan: सारा अली खानने परिधान केला एवढा स्वस्त ड्रेस, किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!  Description: Sara Ali Khan dress: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही अनेकदा महागड्या कपड्यांमध्ये दिसून येते. पण नुकतंच साराने एक खूपच स्वस्त असा ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला