बॉलिवूडच्या ‘सिंघम’चा आज वाढदिवस, २६० कोटींची आहे मालमत्ता

बी टाऊन
Updated Apr 02, 2020 | 16:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Ajay Devgan Birthday: बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगणचा आज ५१वा वाढदिवस आहे. अजय देवगण अशा निवडक कलाकारांपैकी एक आहे जो प्रेक्षकांमुळे मोठा पडदा गाजवतोय.

Ajay Devgn
बॉलिवूडच्या ‘सिंघम’चा आज वाढदिवस, २६० कोटींची आहे मालमत्ता 

थोडं पण कामाचं

  • अजय देवगणचा आज ५१ वा वाढदिवस
  • अजय देवगणचे छंद महागडे, जगतो लग्झरी लाईफस्टाईल
  • अजयची नेटवर्थ २६० कोटी रुपये, तर वार्षिक कमाई ३२ कोटी आहे.

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार ज्याला बॉलिवूडमध्ये ‘सिंघम’ म्हणूनही संबोधलं जातंय. तो अभिनेता अजय देवगण आज म्हणजेच २ एप्रिल रोजी आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतोय. अजय देवगण बॉलिवूडचा एक असा कलाकार आहे, जो प्रेक्षकांच्या प्रेमावर मोठा झालाय. चित्रपट ‘फूल और काँटे’ पासून आपल्या करिअरची सुरूवात केलेल्या अजय देवगणचा प्रवास बघण्यासारखा आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी त्याच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. अजयनं केलेल्या प्रत्येक चित्रपटातील त्याची भूमिका वेगळी होती. कधी त्यानं अँग्री यंगमॅनची भूमिका साकारली तर कधी कॉमेडी करत प्रेक्षकांना खूप हसवलं. तान्हाजी मालुसरेंची भूमिका तर अजयनं जीव ओतून साकारली. त्याचं क्रिटिक्सनं पण खूप कौतुक केलं.

२ एप्रिल १९६९ ला नवी दिल्लीमध्ये जन्मलेल्या अजय देवगणनं १९९१मध्ये ‘फूल और काँटे’ चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याच्या भूमिकेचं नाव अजय हेच होतं. अभिनेता अजय देवगणचे छंद खूप महागडे आहेत आणि तो लग्झरी लाईफस्टाईल जगणं पसंत करतो. त्याचं नेटवर्थ २६० कोटी रुपये आहे आणि त्याची वार्षिक कमाई ३२ कोटी आहे. तर त्याची प्रॉडक्शन कंपनी अजय देवगण फिल्म्स सुद्धा १०० कोटी रुपयांची आहे.

आज अजय देवगण मुंबईत कोट्यवधी किंमतीच्या घरात राहतो. मात्र त्या व्यतिरिक्तही लंडनमध्ये त्याचा एक आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत ५४ कोटी आहे. हा बंगला खूप सुंदर आहे. अजय देवगण जवळ सर्वाधिक महागडी जी वस्तू आहे, त्यात Hawker 800 प्रायव्हेट जेट आहे. ज्याची किंमत ८४ कोटी रुपये आहे.

अजय देवगणला विविध आलिशान कारचा संग्रह करण्याचाही हौस आहे. त्याच्याजवळ अशा अनेक कार आहेत ज्या भारतात खूप ठराविक व्यक्तींजवळ आहे. अजय देवगण जवळ Rolls-Royce Cullinan SUV आहे जी देशात काही खास लोकांजवळच आहे. ६.९५ कोटी रुपयांची ही कार अजय देवगणनं जुलै २०१९ ला खरेदी केलीय. ही कार भारतातील सर्वाधिक महागडी एसयूव्ही आहे. याशिवाय अजय जवळ १.५ कोटींची Maserati Quattroporte, मर्सडीज बेंझ W115 220डी, मिनी कूपर, BMW Z4, रेंज रोवर सारख्या कार पण आहेत.

Hawker 800 – Rs 84 crore

House in London – Rs 54 crore

Rolls-Royce Cullinan SUV

Range Rover Vogue – Rs 2.05 crore

Maserati Quattroporte – Rs 1.5 crore

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी