Akshay Kumar Tests Covid-19 Positive : मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) ‘खिलाडी’ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) पुन्हा एकदा कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमारने स्वत: ट्वीट (Akshay Kumar Tweet) करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे आता अक्षय कुमारला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
अक्षयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘#Cannes2022 मध्ये इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या चित्रपटाबाबत मी खरंच खूप उत्सुक होतो. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मला कोरोना व्हायरसची लागण झाली. म्हणूनच मी विश्रांती घेईन. खूप खूप शुभेच्छा.’ अक्षय कुमारने हे ट्वीट अनुराग ठाकूरला टॅग केले आहे.
अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली आहे. एप्रिल 2021मध्ये अक्षयला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हादेखील अक्षय कुमारने ट्वीट करत आपल्या चाहत्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. अक्षय कुमारला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अक्षय ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग करत होता.