Akshay Kumar gets Injured : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार झाला जखमी

Bollywood Actor Akshay Kumar gets injured while shooting : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अॅक्शन सीनसाठी क्लोजअप शूट करताना जखमी झाला.

Akshay Kumar
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार झाला जखमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार झाला जखमी
  • स्कॉटलंडमध्ये घडली घटना
  • काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये झाले होचे जखमी

Bollywood Actor Akshay Kumar gets injured while shooting  : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अॅक्शन सीनसाठी क्लोजअप शूट करताना जखमी झाला. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाले होते. आता अक्षय जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियां छोटे मियां' या सिनेमाचे शूटिंग स्कॉटलंड येथे सुरू आहे. हे शूटिंग सुरू असताना अक्षय कुमार जखमी झाला. लगेच उपचार करून घेऊन अक्षयने पुरेशी खबरदारी घेत शूटिंग पुढे सुरू ठेवले आहे.

'बडे मियां छोटे मियां' या सिनेमाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर करत आहेत. सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. या सिनेमाचे  वेळापत्रक कोलमडू नये यासाठी अक्षयने दुखापत झाली असूनही शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी बॉलिवूडचे शहेनशहा महानायक अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना जखमी झाले होते. एक अॅक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली होती. पण आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते दुखापतीतून सावरले असल्याचे चित्र आहे. 

अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगसाठी गेले होते. या सिनेमात अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांच्या छातीला मार लागला. त्यांच्या बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली होती. यामुळे प्रोजेक्ट के तसेच इतर अनेक प्रोजेक्टचे शूटिंग रद्द करण्यात आले. हैदराबादमधील AIG रुग्णालयामध्ये उपचार आणि सीटी स्कॅन केल्यानंतर पुढील उपचार आणि आरामासाठी अमिताभ बच्चन मुंबईत आले. 

अमिताभ बच्चन यांच्या दुखापतीच्या घटनेला महिना होत आला असतानाच अक्षय कुमार जखमी झाल्याचे वृत्त आले आहे. पण अक्षयची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत नाही. यामुळे त्याने उपचार घेतल्यानंतर शूटिंग पुढे सुरू ठेवले आहे.

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

मेकअपशिवाय छान किती दिसते...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी