bollywood actor anil kapoor net worth, income, property, luxury car collection, know about his on birthday : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज (शनिवार 24 डिसेंबर 2022) 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनिल कपूरचा जन्म 24 डिसेंबर 1956 रोजी झाला. आज त्याला 66 वर्षे पूर्ण झाली. पण फिटनेस बघून अनिल कपूरचे वय एवढे असेल यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.
अनिल कपूर आजही त्याच्या फिटनेसची काळजी घेतो. त्याने बॉलिवूड प्रचंड मेहनत करून स्वतःचे असे वेगळे स्थान निर्मण केले आहे. संघर्षाचे दिवस आठवले की अनिल कपूर आजही भावूक होतो.
मुंबईत आला त्यावेळी अनिल कपूरची आर्थिक स्थिती नाजूक होती. तो कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी शोमन राज कपूरच्या गॅरेजमध्ये काम करत होता. तिथे एका खोलीच्या घरात वास्तव्यास होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनिल कपूर कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक झाला आहे.
आज वाढदिवसाचे औचित्य साधून अभिनेता अनिल कपूर याच्या संपत्तीबाबत जाणून घेऊ... cabknowledge.com च्या रिपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याची एकूण संपत्ती 134 कोटी रुपये एवढी आहे. अनिल कपूरच्या संपत्तीत मागील काही वर्षांत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूड, हॉलिवूड, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमातून अनिल कपूरच्या उत्पन्नात सातत्याने भर पडत आहे. त्याने वेगवेगळ्या उद्योगांमध्येही गुंतवणूक केली आहे.
अभिनेता अनिल कपूर याच्याकडे 3 लक्झरी बंगले आहेत. तसेच वेगवेगळ्या शहरांमध्ये अनिल कपूरच्या मालकीची संपत्ती आहे. पोर्शे, बेंटले, बीएमडब्लयू, जॅग्वार, ऑडी अशा अलिशान कार अभिनेता अनिल कपूरकडे आहेत.
अभिनेता अनिल कपूरने 'वंश वृक्षम' या तेलुगू सिनेमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. हा सिनेमा जास्त चालला नाही. यश चोप्रा यांच्या 'मशाल' या सिनेमातून अनिल कपूरला ओळख मिळाली. 'मिस्टर इंडिया'ने या अभिनेत्याला रातोरात स्टार बनवले. नंतर अनिल कपूरने अनेक हिट चित्रपट दिले. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची एक गाजलेली जोडी होती.
Santosh Munde: शॉक लागून बीडचा टिक टॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू