बॉलिवुड अभिनेता दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, सायरा बानो यांनी सांगितले कारण

बी टाऊन
Updated May 02, 2021 | 11:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी म्हटले आहे की दिलीप कुमार यांच्या तब्येतीमुळे सामान्य तपासणीसाठी ते आले आहेत. देवाच्या कृपेने आम्ही सर्वजण लवकरच आमच्या घरी परत जाऊ असेही त्यांनी म्हटले.

Dilip Kumar
बॉलिवुड अभिनेता दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, सायरा बानो यांनी सांगितले कारण  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सामान्य तपासणीसाठी दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
  • लवकरच रुग्णालयातून घरी सोडले जाण्याची शक्यता
  • मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले दिलीप कुमार

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi film industry) प्रसिद्ध अभिनेते (famous actor) दिलीप कुमार (Dilip Kumar) हे आरोग्याच्या तक्रारीच्या (health issues) कारणांमुळे मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja hospital) दाखल झाले आहेत. दिलीप कुमार यांच्या पत्नी (wife) आणि अभिनेत्री (actress) सायरा बानो (Saira Banu) यांनी म्हटले आहे की दिलीप कुमार यांच्या तब्येतीमुळे सामान्य तपासणीसाठी (routine checkup) ते आले आहेत. देवाच्या कृपेने आम्ही सर्वजण लवकरच आमच्या घरी (home) परत जाऊ असेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या काळात रुग्णालयात जाणे धोकादायक

पुढे सायरा बानो यांनी म्हटले आहे की जर सर्वकाही ठीक राहिले तर दिलीप कुमार हे उद्याच हिंदुजा रुग्णालयाच्या नॉन-कोव्हिड विभागातून उद्याच सायरा बानो यांच्यासह त्यांच्या घरी परततील. मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात जाणे धोकादायक आहे. दिलीप कुमार हे लवकरच बरे होतील आणि सुरक्षित आपल्या घरी परततील अशी आशा सायरा बानो यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे दिलीप कुमार यांनी गमावले दोन भाऊ

दिलीप कुमार हे सध्या 98 वर्षांचे आहेत. नुकताच त्यांनी आपला वाढदिवस कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा केला होता. गेल्यावर्षी म्हणजेच 2020मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांनी आपले दोन भाऊ गमावले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितले होते की यावर्षी दिलीप कुमार यांचे वय तर वाढेलच, पण लोकांच्या शुभेच्छा आणि दंग्यापासून यावेळी ते दूर राहतील.

दिलीप कुमार यांचे मूळ नाव युसुफ खान

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी आत्ताच्या पाकिस्तानमध्ये झाला होता आणि त्यांचे मूळ नाव युसुफ खान असे होते. नंतर रुपेरी पडद्यावर त्यांना दिलीप कुमार या नावाने प्रसिद्धी मिळाली. एका निर्मात्याच्या सांगण्यानुसार त्यांनी आपले नाव बदलले होते आणि याच नावाने नंतर लोक त्यांना ओळखू लागले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी