ह्रतिक रोशन आणि आलियाचा फोटो व्हायरल, जाणून घ्या काय आहे कारण

बी टाऊन
Updated Jun 12, 2019 | 12:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नुकताच सोशल मीडियावर एक अनसीन फोटो सर्वांसमोर आला. या फोटोत अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री आलिया भट्ट एकत्र दिसत आहेत. या फोटोमध्ये छोटी आलिया खूपच गोड दिसत आहे.

Hritik Roshan
रितिक रोशनसोबत बघा कोण दिसतंय या फोटोत  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: क्यूट एक्ट्रेस आलिया भट्टनं स्वतःच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आलियानं बऱ्याच मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. शाहरूख खान, शाहिद कपूर यांच्याबरोबर तिनं काम केलंच आहे आणि आता तर ती लवकरच सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र तिला अजून तरी बॉलिवूडचा हँडसम अभिनेता ह्रतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी मिळालेली नाहीये आणि अशी कोणती धूसरशीही चर्चा देखील नाहीये. हे सांगण्याचं कारण म्हणजे नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे ह्रतिक रोशन आणि आलिया भट्टचा. हा अनसीन फोटो बराच जुना आहे. यात छोटी आलिया खूपच गोड दिसत आहे.

फेमस फिल्ममेकर आणि आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजनची आई अनू रंजन यांनी एक जुना फोटो शेअर केला आणि तो बघता बघता व्हायरलही झाला. या फोटोमध्ये ह्रतिकबरोबर छोटी आलिया आहे आणि त्याचबरोबर अनेक यंग टॅलेंटसुद्धा आहेत. या फोटोमध्ये हृतिक आणि आलियाबरोबर अनुष्का रंजन, आकांक्षा रंजन, डिजाइनर मसाबा गुप्ता आणि आलियाची मोठी बहिण शाहीनही दिसत आहे. हृतिकच्या लूकवरून त्याचा हा फोटो त्याच्या करिअरच्या सुरूवातीचा असल्याचं दिसत आहे. तर यात हेअरबँड लावून क्यूट आलू पोझ देतांना दिसत आहे. फॅन्सनाही तिचा हा फोटो खूप आवडला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

These are the most adorable ones ,without realising

A post shared by Anu Ranjan (@anuranjan1010) on

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं तर ह्रतिक रोशन लवकरच ‘सुपर ३०’ या फिल्ममध्ये दिसणार आहे. ही फिल्म ‘सुपर ३०’ कोचिंग सेंटरचे संस्थापक आनंद कुमारवर आधारित आहे. आनंद कुमार यांनी आयआयटीमध्ये शिकण्याची इच्छा आहे पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये कोचिंग देतात. या विषयावर संपूर्ण फिल्मचं चित्रिकरण झालंय. ही फिल्म यावर्षी १२ जुलैला रिलीज होणार आहे.

तर आलिया भट्ट सध्या ‘ब्रम्हास्त्र’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ब्रम्हास्त्रचं शूटिंग वाराणसीमध्ये होत आहे. या फिल्ममध्ये आलिया भट्ट पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अयान मुखर्जीच्या या सेटवर आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडले. ही एक साइंटिफिक-फिक्शनल फिल्म आहे. या फिल्ममध्ये रणबीर–आलिया यांची जोडी तर आहेच पण त्यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी