बॉलिवूडमधील चतुरस्त्र नट हरपला, इरफान खान यांचं निधन 

बॉलिवूडमधील चतुरस्त्र नट अशी ओळख असलेल्या इरफान खान याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं आहे. गेले काही दिवस तो कर्करोगाशी झुंज देत होता 

bollywood actor irrfan khan dies at age 54 suffering from neurocrine tumor
बॉलिवूडमधील चतुरस्त्र नट हरपला, इरफान खान यांचं निधन   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन
  • मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होता इरफान, वयाच्या ५४ व्या वर्षी निधन

मुंबई: बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन झालं आहे. मंगळवारी त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इरफानने २०१८ साली माहिती दिली होती की, तो हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरने पीडित आहे. त्यानंतर तो उपचारासांसाठी लंडनला गेला होता. उपचारानंतर तो पुन्हा भारतात आला होता. आज (मंगळवार) अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत इरफानच्या पार्थिवावर मुंबईतील वर्सोवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

काल (मंगळवार) त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. सिनेनिर्माते शूजित सरकार यांनी ही माहिती दिली. 

गेल्या वर्षी इरफाननं ब्लॅकमेल, कारवां आणि पजल सिनेमे केले. इरफानला शूजीत सरकारचा सिनेमा उधम सिंहची ऑफर मिळाली होती. मात्र इरफानच्या गैरहजेरीत हा सिनेमा विक्की कौशलला मिळाला.

लॉकडाउनपूर्वी 'अंग्रेजी मीड‍ियम' झाला होता रिलीज 

'अंग्रेजी मीड‍ियम' हा इरफान खानचा शेवटचा चित्रपट ठरला. हा सिनेमा 'हिंदी मीडियम'चा सिक्वेल होता. या सिनेमात करीना कपूर आणि राधिका मदान मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी इरफान २०१८ मध्ये कारवां आणि ब्लॅकमेल या सिनेमांमध्ये दिसला होता. 

इरफानच्या आईचे नुकतेच झाले निधन 

दरम्यान, इरफानची आई सईदा बेगम यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. रमजानच्या पहिल्याच दिवशी त्यांनी जयपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्याची आई ८२ वर्षांची होती आणि बर्‍याच दिवसांपासून आजारी होती. राजस्थानच्या टोंक येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पण इरफान तिथे जाऊ शकला नव्हता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी