जॉन अब्राहमने शेअर केला ‘हा’ फोटो, पाहा त्याची पत्नी काय म्हणाली!

बी टाऊन
Updated Jul 18, 2019 | 14:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

जॉन अब्राहमनं सोशल मीडियावर आपला एक हॉट फोटो शेअर केलाय. ज्यात तो खूप हँडसम दिसतोय. जॉनच्या या फोटोवर फॅन्स सतत कमेंट करत आहे. यावर जॉनच्या पत्नीनंही विशेष कमेंट केलीय. पाहा काय म्हणाली जॉनची पत्नी...

John Abraham
जॉन अब्राहमनं पोस्ट केला हॉट फोटो  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जॉननं इंस्टाग्रामवर शेअर केला आपला हॉट फोटो
  • फोटोवर सोशल मीडियावर अनेकांच्या कमेंट्स, पत्नी प्रियानंही केली कमेंट
  • २०१४ साली जॉन आणि प्रिया रुंचालचं लॉस एंजिलिसमध्ये झालं लग्न

मुंबई: जॉन अब्राहम बॉलिवूडमधील एक हँडसम हंक आहे. तो तसा विशेष सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत नाही. तो सोशल मीडियावर फक्त आपल्या चित्रपटांशी निगडीत फोटो आणि पोस्ट टाकत असतो. मात्र त्यानं नुकताच स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या फोटोमध्ये जॉन खूपच हँडसम दिसतोय. त्यानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताच त्यावर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. एकीकडे जिथं जॉनचे फॅन्स फोटोवर कमेंट करत आहेत, तिकडे त्याची पत्नी प्रिया रुंचाल हिनंही या फोटोवर कमेंट केलीय.

जॉननं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये जॉन ब्लू जीन्स आणि व्हाईट शर्ट घातलेला दिसतोय. या फोटोत जॉन खूपच हॉट दिसतोय. त्याचा हा फोटो बघताच फॅन्स त्याचं खूप कौतुक करत आहेत, तर त्याची पत्नी प्रिया हिनंही जॉनचं कौतुक केलंय. प्रियानं या फोटोवर कमेंट करत जॉनला क्युटी म्हटलंय. Cutie w a booty'

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Keeping it simple!! : @avigowariker #schoolbuddies #bombayscotishschool

A post shared by John Abraham (@thejohnabraham) on

 

जॉन अब्राहम सारखीच त्याची पत्नीही सोशल मीडियाचा वापर जास्त करत नाही. मात्र जेव्हा आता गोष्ट पतीच्या फोटोची आहे तर तीही मागे कशी राहणार. म्हणूनच आपलं प्रेम व्यक्त करत तिनं ही कमेंट केलीय.

 

 

जॉनची पत्नी प्रियानं अमेरिकेत फायनांशिअल अॅनालिस्ट आणि इन्वेस्टमेंट बँकर म्हणून काम केलंय. काही काळापूर्वी ती लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होती. तर सुरुवातीला प्रिया लॉस एंजिलिसमध्ये राहत होती. जॉननं आपल्या पत्नीबद्दल बोलतांना सांगितलं होतं की, “ती खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे आणि तिला शांत राहून आपलं काम करायला आवडतं. तिच्या या स्वभावाचं मला कौतुक आहे.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Force 2 #johnabraham

A post shared by Priya Runchal (@priya_runchal) on

 

जॉन आणि प्रियानं २०१४ मध्ये लॉस एंजिलिसमध्ये लग्न केलं होतं. तशी प्रिया मूळची हिमाचल प्रदेशच्या मॅकलोडगंजची राहणारी आहे. मात्र ती एनआरआय आहे आणि अमेरिकेत राहते. जॉन आणि प्रियाची भेट २०१० मध्ये मुंबईत झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत होते आणि नंतर त्यांनी लग्न केलं.

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास येत्या १५ ऑगस्टला जॉन अब्राहमचा चित्रपट ‘बाटला हाऊस’ रिलीज होणार आहे. यात जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जॉननं यापूर्वी अखेरचा चित्रपट रोमिया अकबर वॉल्टर केला होता. यात अभिनेत्री मौनी रॉय जॉनसोबत प्रमुख भूमिकेत होती.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी