Bollywood Actor: बॉलिवूड अभिनेत्याने अग्निपथ योजनेवरून उडवली आनंद महिद्रांची खिल्ली 

बी टाऊन
Updated Jun 22, 2022 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anand Mahindra On Agneepath | अग्निपथ योजनेवरून चिघळलेल्या वादामध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घोषणा केली आहे की, सैन्यदलात ४ वर्षे सेवा केल्यानंतर ते अग्निवीरांची भरती करतील.

Bollywood actor Kamal Khan mocks Anand Mahindra over Agneepath scheme
अभिनेत्याने अग्निपथ योजनेवरून उडवली आनंद महिद्रांची खिल्ली   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कमाल खानने अग्निपथ योजनेवरून उडवली आनंद महिद्रांची खिल्ली.
  • केआरकेने ट्विटरवरून साधला निशाणा.
  • आतापर्यंत किती माजी सैनिकांना कामावर ठेवले केआरकेचा सवाल.

Anand Mahindra On Agneepath | मुंबई : अग्निपथ योजनेवरून चिघळलेल्या वादामध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घोषणा केली आहे की, सैन्यदलात ४ वर्षे सेवा केल्यानंतर ते अग्निवीरांची भरती करतील. आनंद महिंद्रा यांनी अग्निपथ योजनेवरून होत असलेल्या हिंसेवर नाराजी व्यक्त करत अग्निवीरांना मिळणाऱ्या ट्रेनिंगला खास असल्याचे म्हटले होते. आता यावरूनच अभिनेता कमाल आर खानने त्यांची खिल्ली उडवली आहे. (Bollywood actor Kamal Khan mocks Anand Mahindra over Agneepath scheme). 

अधिक वाचा : विश्वकप विजेता खेळाडू चक्क पेट्रोल पंपावर लोकांना देतोय चहा

केआरकेने ट्विटरवरून साधला निशाणा

कमाल आर खानने ट्विटरवर लिहले की, "आनंद महिंद्राजी कृपया तुम्ही आम्हाला सांगू शकाल की तुम्ही मागील १० वर्षामध्ये किती माजी सैनिकांना कामावर ठेवले आहे? आणखी एक ट्विट करून कमाल आर खानने आनंद महिंद्रा यांची खिल्ली उडवली आहे. कमाल आर खानने लिहिले की, "हे पाहा! त्यांच्याकडे एवढी मोठी कंत्राटे आहेत. जर श्री आनंद महिंद्राजी यांनी शाही दरबार नाही केला तर सर्व कॉन्ट्रॅक्ट्स नष्ट होतील! केआरकेने या ट्विटसोबत महिंद्रांना दिलेल्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित बातमीही शेअर केली आहे.

यावर लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. शैलेंद्र सिंह यांनी लिहिले की, ते खूप पुढचे बोलत आहेत आणि तुम्ही खूप मागचे बोलत आहात, प्रगती करा, पुढे जा. दरम्यान एका युजरने लिहले की, "पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान नाही आहे, हा नवा भारत आहे आणि आम्ही याबाबतीत आत्मनिर्भर आहोत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपण रशिया आणि अमेरिकेकडे पाहिले नाही पाहिजे. 

लोकांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

आलोक पांडे यांनी लिहिले की, "ज्याच्याकडे पैसा/अनुभव/मॅन पॉवर आहे, त्यालाच कंत्राट मिळेल. तुम्हीही पुढच्या वेळी टेंडर भरा. कोणी थांबवले आहे? जर तुम्हाला करार मिळाला तर तुम्हाला सध्याच्या ट्रेंडनुसार सरकारची बाजू देखील म्हटले जाईल. एका युजर्सने उत्तर दिले की, "त्यांनी भूतकाळाबद्दल चर्चा केली नाही, त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी आश्वासन दिले आहे तसेच अग्निपथ योजनेद्वारे प्रशिक्षण दिले आहे' आणि शिस्तबद्ध आहे आणि यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होईल.

लक्षणीय बाब म्हणजे अग्निपथ योजनेवरून देशभरात तरूण वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले तर त्यानंतर नोकरी कुठे मिळणार, असे तरुणांचे म्हणणे आहे. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटले की, "अग्निपथ योजनेविरोधात सुरू असलेल्या विरोधामुळे मी दु:खी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुनरुच्चार केला होता की अग्निवीर जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला खासकरून रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी