Mithilesh Chaturvedi death : गदर आणि कोई मिल गया फेम मिथीलेश चतुर्वेदी यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

बी टाऊन
Updated Aug 04, 2022 | 11:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mithilesh Chaturvedi death :गदर आणि कोई मिल गया फेम अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे ३ ऑगस्ट रोजी लखनौ येथे हृदयविकाराने निधन झाले. अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना स्टारर गुलाबो सिताबो या सिनेमात ते शेवटचे दिसले होते.

 Bollywood actor Mithilesh Chaturvedi passed away due to heart failure
मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन
  • मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा
  • गदर-एक प्रेम कथा, कोई मिल गया, माय फ्रेण्ड पिंटो गाजलेले सिनेमा

Mithilesh Chaturvedi passed away: अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी ( Mithilesh Chaturvedi ) यांचे ३ ऑगस्ट रोजी लखनौ येथे निधन ( death ) झाले. त्यांना हृदयाच्या आजाराने ग्रासल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमध्ये ( Lucknow) त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यावर उपचारासाठीच ते त्यांच्या गावी गेले होते. 


गदर: एक प्रेम कथा, कोई मिल गया, माय फ्रेंड पिंटो, फटा पोस्टर निकला हिरो आणि रेडी यांसारख्या अनेक सिनेमांमधून ते प्रेक्षकांसमोर आले आहेत. ते नाट्यविश्वाचा सक्रिय भाग देखील होते आणि शोबिझमधील कलाकारांच्या वर्तुळातील एक नाव म्हणजे मिथिलेश चतुर्वेदी होते. 

अधिक वाचा : सौरव घोषालनं स्क्वॉशमध्ये मिळवलं कांस्यपदक

त्यांच्या निधनाने सगळ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिल्याचं समोर आलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, “तुम्ही जगातले सर्वात सुंदर बाबा होतात, तुमचा जावई असूनही मला तुम्ही मुलासारखं प्रेम दिलंत, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

अधिक वाचा :  रिंकू राजगुरुचा सिजलिंग लुक


पटियाला बेब्स सारख्या टीव्ही शो आणि स्कॅम 1992 सारख्या वेबसीरिजमध्येही ते दिसले होते. त्यात त्यांनी राम जेठमलानीची भूमिका साकारली होती. ते अखेरचे अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानासोबत गुलाबो सिताबोमध्ये दिसले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी