Nawazuddin Siddiqui Harassment Case : बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या नवाझुद्दीनवर पत्नीने केले गंभीर आरोप

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui get court notice on wife aaliya complaint : सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड कलाकार नवाझुद्दीन सिद्दीकीवर त्याची पत्नी आलिया हिने गंभीर आरोप केले आहेत.

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui get court notice on wife aaliya complaint
बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या नवाझुद्दीनवर पत्नीने केले गंभीर आरोप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या नवाझुद्दीनवर पत्नीने केले गंभीर आरोप
  • नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या आईवर छळ केल्याचा आरोप
  • नवाझुद्दीनला कोर्टाने बजावली नोटीस

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui get court notice on wife aaliya complaint : सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड कलाकार नवाझुद्दीन सिद्दीकीवर त्याची पत्नी आलिया हिने गंभीर आरोप केले आहेत. नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या आईने आपला छळ केला असा गंभीर आरोप आलियाने केला आहे. पत्नी आलिया हिने केलेल्या आरोपांप्रकरणी नवाझुद्दीनची बाजू समजून घेण्यासाठी कोर्टाने त्याला नोटीस बजावली आहे. । झगमगाट

माझी अशील आलिया हिला राहत्या घरातून बाहेर काढण्यासाठी नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाने बरेच प्रयत्न केले. आलियाला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली, तिचा छळ करण्यात आला. काही वेळा तर आलियाला उपाशी ठेवण्यात आले. नवाझुद्दीन मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास इच्छुक दिसत नाही. असा गंभीर आरोप आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला. 

आलियाने नवाझुद्दीन विरोधात कोर्टात केस केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आलियाला सहकार्य मिळालेले नाही, असे आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितले. 

मीडिया रिपोर्टनुसार नवाझुद्दीन सिद्दीकीची आई आणि आलिया यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नवाझुद्दीन सिद्दीकीच्या आईने आलिया विरोधात IPC 452, 323, 504, 506 अंतर्गत तक्रार नोंदवली होती. नवाझुद्दीन सिद्दीकीची आई आलियाला नवाझुद्दीन सिद्दीकीची पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार नाही. नवाझुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांचा तलाक (घटस्फोट) दोन वर्षांपूर्वीच झाला होता, असे नवाझुद्दीन सिद्दीकीच्या आईचे म्हणणे आहे. 

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या दाव्यात तथ्य आहे तर आजही नवाझुद्दीन सिद्दीकी पत्नी म्हणून आलियाचा उल्लेख सगळ्या कागदपत्रांमध्ये कसा करतो, असा प्रश्न आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीची आई नवाझुद्दीन सिद्दीकीच्या मुलांना अनौरस म्हणत आहे. पण आलिया आजही नवाझुद्दीन सिद्दीकीच्या घरीच वास्तव्यास आहे. सध्या नवाझुद्दीन सिद्दीकी शूटिंगमध्ये बिझी आहे. तो शूटिंगचा व्याप संपवून लवकरच कोर्टाला उत्तर देईल. यानंतरच या प्रकरणात पुढे काय होणार ते स्पष्ट होण्यास मदत होईल, असे आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले.

सिद्धार्थ कियाराचे लग्न फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार
Kiara Advani चा डाएट प्लॅन

आलियाचे मूळ नाव अंजना किशोर पांडे होते. पण नवाझुद्दीन सिद्दीकी सोबत निकाह केल्यानंतर अंजना किशोर पांडे हिचे नाव बदलून आलिया जेनब करण्यात आले. आजही ती आलिया याच नावाने ओळखली जाते, असे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी