रणबिर कपूर कोरोना पॉझिटिव्ह, संजय लीला भन्साळीही कोरोना पॉझिटिव्ह

Bollywood Actor Ranbir Kapoor tests positive for COVID19 बॉलिवूड अभिनेता रणबिर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. सध्या रणबिरचे उपचार सुरू आहेत.

Bollywood Actor Ranbir Kapoor tests positive for COVID19
रणबिर कपूर कोरोना पॉझिटिव्ह 

थोडं पण कामाचं

  • रणबिर कपूर, संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह
  • रणबिर कपूरचा ब्रह्मास्त्र सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार
  • महाराष्ट्रात ९७ हजार ६३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबिर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. सध्या रणबिरचे उपचार सुरू आहेत. तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसत आहे, अशी माहिती रणबिरची आई नीतू कपूर यांनी दिली. (Bollywood Actor Ranbir Kapoor tests positive for COVID19)

रणबिर ३८ वर्षांचा आहे. कोरोना झाल्याचे कळल्यापासून तो घरातच त्याच्या खोलीत क्वारंटाइन झाला आहे. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत तो उपचार घेत आहे, असे नीतू कपूर यांनी सांगितले. रणबिर लवकर बरा व्हावा यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे नीतू कपूर यांनी आभार मानले.

रणबिर कपूरचा ब्रह्मास्त्र सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार

लवकरच ब्रह्मास्त्र सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबिर कपूर, आलिया भट, मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी आलिया भटने सोशल मीडियावर निवडक फोटो शेअर केले. यात काली देवीच्या मूर्तीसमोर आलिया भट, रणबिर कपूर आणि अयान उभे असल्याचे दिसत आहे. 

संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यालाही कोरोना झाला आहे. भन्साळीला कोरोना झाल्यामुळे गंगुबाई काठियावाडी सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. आलिया भट ब्रह्मास्त्र आणि गंगुबाई काठियावाडी या दोन्ही सिनेमात अभिनय करत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ती घरात क्वारंटाइन झाली आहे. सध्या आलियाची दररोज कोरोना चाचणी सुरू आहे. आतापर्यंतच्या चाचणीत आलिया कोरोना निगेटिव्ह आहे.

महाराष्ट्रात ९७ हजार ६३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात ९७ हजार ६३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जानेवारी २०२१ मध्ये कमी होत असल्याचे चित्र होते. पण फेब्रुवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. हा कल मार्च महिन्यातही दिसत आहे. यामुळे पुन्हा अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ दिसत आहे. मुंबईतील कोरोना संकटावर लक्ष ठेवून आहोत, आवश्यकता भासल्यास अंशतः लॉकडाऊन सारखे उपाय करण्याबाबत विचार करू, असे संकेतही राज्य सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्रात लसीकरण सुरू

राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. पण कोरोना संकट संपलेले नाही. यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक मास्क आहे. मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे, सोशल डिस्टंस राखणे, वैयक्तिक स्वच्छतेची आरोग्याची काळजी घेणे तसेच हात अधूनमधून धुवून स्वच्छ करणे अथवा सॅनिटायझर वापरुन स्वच्छ करणे आवश्यक आहे. 

मुंबईला कोरोनाचा जास्त धोका

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. शिवाय या आजाराच्या विषाणूचे नवनवे अवतार जगभर सक्रीय होत आहेत. मुंबईत दोन मोठे विमानतळ आहेत. शिवाय रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहनांतून दररोज मुंबईत मोठ्या संख्येने नागरिक कामाच्या निमित्ताने ये-जा करतात. यामुळे मुंबईला कोरोनाचा जास्त धोका आहे. सेलिब्रेटींनाही कामाच्या निमित्ताने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

मनोरंजनसृष्टीतील काही कलाकारांना झाला कोरोना

याआधी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकारांना कोरोना झाला. अनेक कलाकारांनी घरातच क्वारंटाइन होऊन उपचार घेतले. पण ज्यांची तब्येत जास्त बिघडली त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. ज्या सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या सेटवर एकपेक्षा जास्त जणांना कोरोना झाला तिथे काही काळासाठी शूटिंग थांबवून आवश्यक ते कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यात आले. तसेच आजारी कलाकारांना वैद्यकीय मदत देण्यात आली. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही कोरोना झाला होता. बच्चन कुटुंबातील सदस्यांनी मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी