Ranveer Singh Fitness: रणवीर सिंगसारखी जबरदस्त बॉडी हवी आहे तर मग फिटनेस रूटीन आणि डाएट प्लान फॉलो करा

बी टाऊन
Updated Jul 24, 2022 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer Singh Fitness: सध्या रणवीर सिंग त्याच्या फिट बॉडीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा मस्क्युलर लूक पाहता तो आता बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेता बनला आहे असे म्हणता येईल. रणवीर अनेकदा इंस्टाग्रामवर त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. तो त्याच्या वर्कआउटमध्ये कार्डिओ आणि वेट एक्सरसाइज दोन्हीचा समावेश करतो. याशिवाय त्याचा डाएट प्लानही खूप प्रभावी आणि फॉलो करण्यासारखा आहे.

Bollywood actor Ranveer Singh fitness routine and diet plan
रणवीर सिंगचे फिटनेस रुटीन आणि डाएट प्लान  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • रणवीर सिंगचा डाएट प्लान आणि फिटनेस रुटीन
  • वर्कआउट आणि डाएटचा योग्य मेळ असणं गरजेचे असल्याचं रणवीर सिंग म्हणतो
  • फिट राहण्यासाठी उच्च प्रथिने आणि कमी कार्ब आहार घेणे उत्तम

Ranveer Singh Fitness: सध्या रणवीर सिंग ( Ranveer Singh ) त्याच्या फिट बॉडीमुळे (Fitness ) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा मस्क्युलर लूक पाहता तो आता बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेता बनला आहे असे म्हणता येईल. रणवीर अनेकदा इंस्टाग्रामवर त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो.त्याचे शेअर केलेले फोटो पाहून असे म्हणता येईल की, तो त्याच्या वर्कआउटमध्ये कार्डिओ आणि वेट एक्सरसाइज दोन्हीचा समावेश करतो. याशिवाय त्याचा डाएट प्लानही (Diet plan ) खूप प्रभावी आणि फॉलो करण्यासारखा आहे.( Bollywood actor Ranveer Singh fitness routine and diet plan )


सडपातळ शरीरापेक्षा लोकांनी निरोगी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे रणवीर सिंगचे मत आहे. यासाठी वर्कआउट आणि डाएट यांचा मेळ खूप महत्त्वाचा आहे. यामुळेच जिममध्ये तासनतास घाम गाळणे आणि शिस्तबद्ध जीवन जगणे त्याला आवडते.

अधिक वाचा : कलियुगातील आधुनिक श्रावणबाळ


तंदुरुस्त राहण्यासाठी अभिनेता रणवीर सिंग घरच्या जेवणाला प्राधान्य देतो आणि जंक फूडपासून दूर राहतो. त्याच्या तंदुरुस्त शरीराचे रहस्य उच्च प्रथिने आणि कमी कार्ब आहार म्हणता येईल. रणवीर दारूपासून दूर राहतो


रणवीर सिंगच्या मते, तुम्ही तुमच्या रोजच्या वर्कआउटला दोन भागांमध्ये विभागू शकता, ज्यामध्ये सकाळी 1 तास कार्डिओ व्यायाम करणे आणि संध्याकाळी वजन आणि व्यायाम करणे समाविष्ट आहे. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.


पोहणे, हाताचा व्यायाम आणि शक्तीसाठी धावणे देखील रणवीरला आवडते. याशिवाय त्याला बास्केटबॉल आणि बॉक्सिंग खेळायलाही आवडते.

अधिक वाचा : श्रावण सोमवारी हे 4 उपाय केल्यानं दूर होतील भांडण


शरीर उत्तम ठेवण्यासाठी सकाळी कार्डिओ व्यायाम केला तर नको असलेली चरबी जाळणे सोपे होईल आणि संध्याकाळी वजन आणि वर्कआउट्सच्या मदतीने तुम्ही स्नायूंना मजबूत करू शकता.

एका मुलाखतीत रणवीर सिंगने सांगितले की, शरीराला आकारात ठेवण्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी कशी बनवायची आहे हे तुम्ही आधी ठरवणे आवश्यक आहे. त्याने सांगितले की तो हृतिक रोशनला आपली प्रेरणा मानतो. तर त्याची पत्नी दीपिका पदुकोण देखील त्याच्या वर्कआउटची प्रेरणा आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी