Salman Khan : सलमान खानला 30 एप्रिलपर्यंत ठार मारणार, पोलिसांकडे आला धमकीचा कॉल

Bollywood actor Salman Khan will be killed by April 30, Mumbai Police control room received a threat call : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आली आहे. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला.

Bollywood actor Salman Khan
सलमान खानला 30 एप्रिलपर्यंत ठार मारणार, पोलिसांकडे आला धमकीचा कॉल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सलमान खानला 30 एप्रिलपर्यंत ठार मारणार, पोलिसांकडे आला धमकीचा कॉल
  • मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला
  • सलमानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार

Bollywood actor Salman Khan will be killed by April 30, Mumbai Police control room received a threat call : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आली आहे. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव रॉकी भाई (रोकी भाई) असे सांगितले. हा कॉल राजस्थानच्या जोधपूरमधून आला होता. रॉकी भाई अशी ओळख सांगत फोन करणाऱ्याने सलमानला 30 एप्रिल पर्यंत ठार मारणार अशा स्वरुपाची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने टाईमलाईन जाहीर केल्यामुळे पोलिसांनी या कॉल प्रकरणी तातडीने तपास सुरू केला आहे. 

याआधी सलमानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांना धमकीचा ई मेल पाठवून अभिनेत्याने गुंड लॉरेन्स बिश्नोईशी बोलावं असं सांगितलं होतं. हा मेल रोहित गर्गच्या नावाने पाठवण्यात आला होता. गँगस्टर गोल्डी ब्रार यानेही सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच आधीपासूनच तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे उद्दिष्ट असल्याचे म्हटले होते. या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.

काही दिवसांपासून सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही ही बुलेटप्रूफ कार वापरण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सलमान पोलिसांच्या सूचनांचे पालन करत आहेत. ही खबरदारी घेतली जात असली तरी सलमानला धमकी मिळणे थांबलेले नाही. 

मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर

कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS

काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाली होती. ही हत्या झाल्यानंतर सलमान खानला पण धमकी देण्यात आली. यानंतर अधूनमधून सलमानला धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे पोलिसांनी सलमानच्या संरक्षणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता सलमान खान याने पोलिसांच्या संरक्षणासह स्वतःच्या खासगी संरक्षण यंत्रणेचीही मदत घेण्यास सुरुवात केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जाणून घ्या ज्योतिबांचे प्रगल्भ विचार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी