पत्नी मीरासोबत भांडल्यानंतर कसं वाटतं, शाहिदनं गुपित उघड केलं

बी टाऊन
Updated Jun 16, 2019 | 19:20 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूडचा चार्मिंग चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता शाहिद कपूर.नुकताच शाहिद नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आला होता.त्यानं यावेळी अनेक गुपितं उघड केली.सोबतच पत्नी मीरासोबत भांडण झाल्यानंतर त्याला कसं वाटतं ते ही सांगितलं

Shahid Kapoor and Mira Rajput
शाहीद आणि मीराचं जेव्हा भांडण होतं तेव्हा... 

मुंबई: शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे कपल बी टाऊनमधील एक चर्चित कपल आहे. दोघांची जोडी खूप सुंदर दिसते आणि हे कपल सध्या आदर्श जोडी म्हणून नावारुपाला येत आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. पण सामान्य पती-पत्नी प्रमाणे त्या दोघांमध्येही भांडणं होत असतात, असं शाहिदनं नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सांगितलं. शाहिद आणि मीरामधील भांडणं हे कधी-कधी खूप गंभीर वळणावर जातात आणि कधी-कधी हे भांडण १५-१५ दिवस चालतं, असंही शाहिदनं सांगितलं.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये नुकतीच शाहिदनं हजेरी लावली होती. त्यावेळी तो म्हणाला, ‘मी आणि मीरा भांडलो की मला खूप नैराश्य येतं, मला खूप त्रास होतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला वेळ हवा असतो, असं शाहिदनं सांगितलं. कधी-कधी भांडणानंतर बाहेर पडण्याचा हा वेळ १५-१५ दिवसांचा असतो. पण अखेर आम्ही बोलतो आणि या तणावातून बाहेर पडतो.’

या लव्हली जोडप्यामध्ये भांडण झाल्यानंतर बोलण्यासाठी पहिले पुढाकार कोण घेतं? हा प्रश्न नेहानं विचारल्यावर शाहिदनं उत्तर दिलं, ‘हे स्पष्ट आहे.’ त्यावर नेहानं मीरा? असं म्हटल्यावर शाहिदनं नाही म्हणत स्वत:कडे हात दाखवला. अभिनेता शाहिदला बायकोसोबत भांडण करणं योग्य वाटतं का? नेहाच्या या प्रश्नावर शाहिदनं हो असं उत्तर देत सांगितलं, ‘नवरा-बायकोमधील भांडण हे त्यांच्या नात्यासाठी चांगलंच असतं. एकमेकांच्या विचारांवर असहमती दर्शवणं आणि एकमेकांच्या साथीनं संकटांवर मात करणं यानेच तर नातं दृढ होतं. कोणत्याही नवरा-बायकोमध्ये समस्या येत असतात, मात्र त्या मागे टाकत पुढे जायचं असतं.’

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झालं. दोघंही आता दोन मुलांचे पालक आहेत. शाहिद-मीरा एक मुलगी मिशा आणि मुलगा झेन आहे.

 

 

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर शाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूरनं नामवंत डॉक्टर कबीर सिंहची भूमिका साकारलीय. जो आपल्या प्रेयसीच्या दुसऱ्या कुणाबरोबर झालेल्या विवाहानंतर स्वत:चं आयुष्य उद्ध्स्त करून घेतो. हा चित्रपट तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा ऑफिशिअल रिमेक आहे. यात शाहिद सोबत अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डीनं केलंय. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पत्नी मीरासोबत भांडल्यानंतर कसं वाटतं, शाहिदनं गुपित उघड केलं Description: बॉलिवूडचा चार्मिंग चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता शाहिद कपूर.नुकताच शाहिद नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आला होता.त्यानं यावेळी अनेक गुपितं उघड केली.सोबतच पत्नी मीरासोबत भांडण झाल्यानंतर त्याला कसं वाटतं ते ही सांगितलं
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles