Baba Siddique Iftar | मुंबई : सध्या रमजानचा महिना सुरू आहे. देशभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना पवित्र महिना असतो. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या रफ्तार पार्टीची दरवर्षी चर्चा होत असते. अनेक बॉलिवूड कलाकार या इफ्तार पार्टीला हजेरी लावत असतात. लक्षणीय बाब म्हणजे बॉलिवूड मधील दोन दिग्गज कलाकार शाहरूख खान आणि सलमान खान हे देखील या पार्टीला आवर्जुन उपस्थित राहतात. (Bollywood actors attend Baba Siddiqui's Iftar party).
शाहरूख आणि सलमान मधील दुरावा याच इफ्तार पार्टीत संपल्याचं बोलले जाते. त्यामुळे या इफ्तार पार्टीची दरवर्षी जोरदार चर्चा होते. यंदाही अनेक बॉलिवूड कलाकार या पार्टीला पोहचले होते. यंदाच्या इफ्तार पार्टीत सलमानचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्याने यावेळीच्या इफ्तार पार्टीत ब्लॅक शर्ट आणि डेनिम पॅंट असा पेहराव घातला होता.
तर शाहरूख खानने त्याच्या नेहमीच्या शैलीत म्हणजेच ब्लॅक कुर्ता-पायजमा अशा आकर्षक पेहरावात पार्टीला हजेरी लावली. यावेळी शाहरूखने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सलमानसोबत त्याचे वडील सलीम खान, सोहेल खान, अरबाज खान, अलवीरा खान आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री याने देखील इफ्तार पार्टीला हजेरी लावली. बाबा सिद्दीकी यांना स्वत: सलीम खान यांचा हात धरून त्यांच्यासोबत फोटो काढल्याचे बोलले जाते.
लक्षणीय बाब म्हणजे मिस युनिवर्स २०२१ हरनाज संधूनेही इफ्तार पार्टीला हजेरी लावली. पार्टीतला तिचा लूक खूप आकर्षित होता. पार्टीत हरनाज ऑरेंज आणि ब्राऊन कुर्ता-सलवार अशा भारतीय पोशाखात दिसली.
या पार्टीत सर्वाधित चर्चा झाली ती म्हणजे सना खानची. धर्मासाठी बॉलिवूडला रामराम करत सना खानने वेगळी वाट निवडली. तिच्या या निर्णयाची त्यावेळी मोठी चर्चाही झाली होती. इफ्तार पार्टीतही सना खान पारंपारिक बुरखा घालून पती अनस सईदसह सहभागी झाली.