Cannes 2022: दीपिका पदुकोणने भारतीय चाहत्यांना दिली खुशखबर; कान्स फिल्म फेस्टिवलच्या परीक्षकपदी दीपिकाची वर्णी 

बी टाऊन
Updated Apr 28, 2022 | 08:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Deepika Padukone । बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या भारतीय चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सोबतच भारताची मान उंचावली आहे.

Bollywood actress Deepika Padukone has been selected as the coach of Cannes Film Festival
कान्स फिल्म फेस्टिवलच्या परीक्षकपदी दीपिकाची वर्णी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या भारतीय चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
  • कान्स फिल्म फेस्टिवलच्या प्रशिक्षकपदी दीपिकाची वर्णी.
  • या सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवलच्या अध्यक्षपदी फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांची वर्णी लागली आहे.

Deepika Padukone । नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) तिच्या भारतीय चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सोबतच भारताची मान उंचावली आहे. दरम्यान दीपिकाने बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (75th cannes film festival) ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. दीपिकाने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट करत माहिती दिली आहे. 

अधिक वाचा : स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी संपल्यामुळे प्रगती थांबते

विसेंट लिंडन यांच्याकडे अध्यक्षपद 

दरम्यान, या सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवलच्या अध्यक्षपदी फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांची वर्णी लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे दीपिका पदुकोण देखील या पॅनेलची सदस्य आहे. कान्स फेस्टिव्हल हे यंदाच्या वर्षी १७ मे ते २८ मे या दरम्यान आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे लूक खूप चर्चेचा विषय ठरणार आहेत. 

 
खुद्द दीपिकाने याबाबतची एक पोस्ट करून माहिती दिली आहे. यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड क्रोनेनबर्ग यांच्या 'क्राइम ऑफ द फ्युचर' हा चित्रपट स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये लिया सेडक्स, क्रिस्टन स्टेवर्ट आणि विगो मॉर्टेन्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दक्षिण कोरियाच्या 'डिसिजन टू लिव्ह' या चित्रपटाचाही समावेश आहे.

आजवर कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिग्गजाची हजेरी  

यापूर्वी देखील या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. आजवर या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत, सोनम कपूर दीपिका पादुकोण या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या फिल्म फेस्टिव्हलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे नवनवीन स्टाइल, लूक आणि फॅशन चाहत्यांना आकर्षित करत असते. तसेच झगमगीत पोशाख आणि सर्वांत हटके स्टाइल या रेड कार्पेटवरील कलाकारांच्या लूक्सचं वैशिष्ट्य असते. लक्षणीय बाब म्हणजे जगभरातील प्रसिद्ध चित्रपटांपेक्षा अनोखा मेळा इथे पाहायला मिळतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी