आदित्यची दिशाची डिनर डेट ठरलीयं ट्रोल्सना निमंत्रण, आदित्य दिशाचे फोटो व्हायरल

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 20:08 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Aditya Disha Dinner Date & Trolls : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस दिशी पटानी यांची डिनर डेट ट्रोल्सना निमंत्रण ठरली. या दोघांच्या भेटीचे फोटो व्हायरल होत असुन दिशाला ट्रोल्स केले जात आहे.

Aaditya Thakare and Disha Patani on Dinner date
आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : बॉलिवूडची सुंदर एक्ट्रेस दिशा पटानी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तीचे फोटो तर कधी तीच्या फिल्मसाठी ती चर्चेत राहिली आहे. याशिवाय दिशा कोणाला डेट करते आहे, हा एक चर्चेचा विषय बनला आहे.  सध्या दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती शिवसेना युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या सोबत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये दिशा पटानी आदित्य ठाकरे यांच्या सोबत डिनरसाठी गेली होती. त्यांच्या या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर वायरल  होताच नेटकऱ्यांनी दिशाची चांगलीच खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे.

याआधी दिशा आणि टायगर श्रोफला डेट करत होती. त्याच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण आदित्य ठाकरे आणि दिशा यांच्या जुहूतील भेटीचे फोटो वायरल होताच या फोटोत दिशाला टायगर सोबत नसल्याने नेटकऱ्यांनी लिहिले, “टायगर जिंदा है” दुसऱ्या एकाने लिहिले की, “‘टायगर कहा है” “एक था टायगर”. दिशाला ट्रोल्स करण्याबरोबरच काही नेटकऱ्यांनी टायगरचे सांत्वनही केले आहे. टायगरचे सांत्वन करताना ते लिहितात, “अब टायगर का क्या होंगा?” यावर एका युजरने “टायगर जिंदा है क्या?” असे कमेंट केलं आहे. तर “अब फिर एक बार टायगर के पैर में चोट लगने वाली है” अशा कमेंट करत युजर्सनी दिशाची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#dishapatani with #adityathackeray snapped for dinner in juhu #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

Aditya Disha Date Troll comments

याआधीही आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र लंचसाठी भेटले होते. यादोघांचे एकत्र असणं टायगर श्रॉफ फॅन्सच्या जिव्हारी लागलं होत. यामुळे टायगर फॅन्स दिशाला ट्रोल करत आहेत. दिशा अनेकदा टायगर श्रॉफ सोबतही डिनर डेटसाठी गेली आहे. या दोघांच्या जोडीला चाहत्यांची खास पसंती आहे.

दिशाला एम एस धोनी या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली आहे. त्याचबरोबर दिशाने ‘बागी २’मधून टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर केली आहे. या दोघांच्या जोडीला मोठ्या प्रमाणावर चाहत्याची पसंती मिळाली होती. नुकतीच रिलीज झालेल्या ‘भारत’मध्येही तीने खास भूमिका केली आहे, या भूमिकेसाठी तिला खूप प्रशंसाही मिळाली आहे. भारत चित्रपटातील स्लो मोशन गाण्यातील दिशा आणि सलमान यांच्यातील केमेस्ट्रीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. तसेच दिशा लवकरच एक्टर आदित्य रॉय कपूरसोबत ‘मलंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे वृत्त आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आदित्यची दिशाची डिनर डेट ठरलीयं ट्रोल्सना निमंत्रण, आदित्य दिशाचे फोटो व्हायरल Description: Aditya Disha Dinner Date & Trolls : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस दिशी पटानी यांची डिनर डेट ट्रोल्सना निमंत्रण ठरली. या दोघांच्या भेटीचे फोटो व्हायरल होत असुन दिशाला ट्रोल्स केले जात आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles