VIDEO: जिम सूट घालून जान्हवी कपूर रस्त्याने पायी चालत, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच! 

बी टाऊन
Updated Jun 12, 2019 | 20:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Janhvi Kapoor Hot look: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या जिम सूटमुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे.

janhvi kapoor_instagram
VIDEO: जिम सूट घालून जान्हवी कपूर रस्त्याने पायी चालत, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच!   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. आता ती आपल्या जिम सूटमुळे चर्चेत आली आहे. आता तिचा एक नवा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवी कपूर नुकतीच जिमच्या बाहेर स्पॉट झाली. खास गोष्ट अशी की, ही अभिनेत्री गाडीने नव्हे तर चक्क पायी चालत जिमपर्यंत पोहचली. यावेळी तिचं जिम सूट पाहून रस्त्यावरील लोकंही थक्क झाले होते. यावेळी प्रत्येकाची नजर ही जान्हवीवरच होती. जान्हवीने ब्लॅक कलरचा जिम सूट घातला होता. या लूकमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत होती. 

तिचा हा व्हिडिओ नुकताच समोर आला असून आता सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी ब्लॅक टॉप आणि ब्लॅक शॉर्ट पँटमध्ये दिसून येतेय. यासोबतच जान्हवीने पायात स्लीपर घातली होती. यावेळी जान्हवीने आवर्जून आपली आवडीची बॅग देखील सोबत घेतली होती. त्याचं झालं असं की, जिमकडे जाणारा रस्ता आज(बुधवार) हा काही कारणांमुळे बंद होता. त्यामुळे  जान्हवीला कार जिमपर्यंत नेता येत नव्हती. त्यामुळे जान्हवी आपल्या बॉडीगार्डसोबतच पायी चालतच जिमपर्यंत गेली. 

जान्हवीने सैराटचा रिमेक असलेल्या 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यावेळी तिच्यासोबत ईशान खट्टर हा देखील होता. दोघांच्या अभिनयाचं कौतुकही त्यावेळी करण्यात आलं होतं. पण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. पण असं असलं तरीही जान्हवीकडे आता बऱ्याच सिनेमांची ऑफर आहे. जान्हवी सध्या गुंजन सक्सेना यांच्यावरील आधारित बायोपिकचं शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती गुंजन सक्सेना या पायलट महिलेची भूमिका साकारत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#jhanvikapoor snapped at gym today #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या सिनेमानशिवाय जान्हवी करण जोहरचा सिनेमा 'तख्त'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचंही लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. याशिवाय जान्हवी रुह आफजामध्येही ती दिसणार आहे. यामुळे जान्हवी पुढील काही दिवस बरीच व्यस्त असणार आहे. यामुळेच आता तिने आपल्या फिटनेसकडेही लक्ष देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा तिला वेळ मिळतो त्या-त्या वेळी ती जिममध्ये जाणं पसंत करतं. धडक सिनेमा फारसा न चालल्याने आता पुढील काही सिनेमांमध्ये जान्हवी कसं काम करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे याबाबत जान्हवीसुद्धा सिनेमांच्या पटकथांबाबत अधिक चोखंदळ झाली आहे. सध्या स्टार किड्सपैकी जान्हवी ही सर्वात जास्त चर्चेत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: जिम सूट घालून जान्हवी कपूर रस्त्याने पायी चालत, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच!  Description: Janhvi Kapoor Hot look: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या जिम सूटमुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles