अभिनेत्री कंगना राणावतकडून मोठा गौप्यस्फोट

बॉलिवूडची क्विन कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. हा पुरस्कार तिच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल देण्यात आला आहे. तिचे चित्रपट नेहमीच काहीतरी वेगळेपण देऊन जातात.

Bollywood's Queen Kangana Ranaut's got Padmshree award
बॉलिवूडची क्विन कंगना राणावतने केला गौप्यस्फोट!  |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूडची क्विन कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. हा पुरस्कार तिच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल देण्यात आला आहे. तिचे चित्रपट नेहमीच काहीतरी वेगळेपण देऊन जातात. या पुरस्कारासाठी नामांकन झाल्यानं कंगनानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सगळ्यांचे आभार मानलेत. विशेष म्हणजे, कंगना ही पद्मश्री पुरस्कार मिळवणारी वयानं सर्वांत लाहान अभिनेत्री ठरली आहे. नामांकन मिळाल्यानंतर चित्रपटसृष्टीतील सगळ्या मान्यवरांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

कंगना नेहमीच तिच्या स्पष्ठवक्ते पणामुळे चर्चेत असते, तिच्या या स्वभावाचे काहीजण कौतुक करतात तर, काहीजण टीका देखील करतात. पण कंगनाला स्वत:चे मत मांडण्यापासून कोणी रोखू शकत नाही. अलिकडेच तिने एक गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, तिला तीन वर्षापूर्वीच हा पुरस्कार मिळणार होता परंतु, तिच्याविरूध्द कोणीतरी कट कारस्थान करून तिच्या घरी नोटीस पाठवली, आणि तिचे नाव या अवॉर्डमधून वगळण्यात आलं. त्यामुळे त्यावेळेस हा अवॉर्ड प्रियंका चोपडाला देण्यात आला असल्याचं तिनं सांगितलं आहे. कंगनाचा पंगा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली नसली तरी चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंगा चित्रपटात कंगनाने एका भारतीय कब्बडीपटूची भूमिका बजावली आहे. 

 

 

अदनान सामीबद्दल काय म्हणाली कंगना?

त्याचबरोबर तिनं अदनान सामीला शुभेच्छा देखील दिल्या, आणि ते या पुरस्कारासाठी पात्र आहेत तसेच ज्यांनी त्यांना विरोध केला आहे त्या सर्वांना त्याच्या भारतीय नसण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण आपला भारत देश हा फक्त जमिनीचा एक भाग नसून येथे विविधता आहे. असंही ती म्हणाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी