‘पुढच्या वर्षी हिला ऑलंपिकला पाठवा’, यूजर्स मलायकाला पुन्हा ट्रोल

बी टाऊन
Updated May 15, 2019 | 20:34 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अभिनेत्री मलायका अरोरानं कुठला व्हिडिओ किंवा फोटो शेअर केला आणि त्यावर काही कमेंट्स आल्या नाहीत, असं होत नाही. तिच्या प्रत्येक फोटो-व्हिडिओवरून यूजर्स ट्रोलिंग करणं सोडत नाहीत. पाहा आता काय घडलं मलायकाबाबत...

Malaika Arora
मलायकाचा नवीन वर्कआऊट व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती नेहमीच आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती कधी योगा करतांना दिसते तर कधी जिममध्ये घाम गाळताना... मलायकाच्या हॉट फिगरचं रहस्य वर्कआऊट करणंच आहे. तासंनतास व्यायाम करत ती स्वत:ला मेटेंन ठेवत असते. आता मलायकानं आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये मलायका पुन्हा एकदा जबरदस्त वर्कआऊट स्टंट करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होताच व्हायरल झालाय आणि या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्सही पाहायला मिळतायेत.

मलायकाचा हा व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स तिला 'फायर ' म्हणून संबोधले आहे.  या व्हिडिओमध्ये मलायका एक प्रॉपचा वापर करतांना दिसतेय. प्रॉपच्या आधारे मलायका अरोरा बॉडीला मूव्ह करत एक बॅक फ्लिप मारतांना दिसतेय. हा जबरदस्त वर्कआऊट मलायका खूप सहजतेनं करतांना दिसतेय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#midweekmotivation .... look Wat u made me do ....... @samsmith @namratapurohit @reebokindia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

मलायकाचा हा व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स खूप स्तुती करतांना दिसतायेत. अनेक जण तिच्या व्हिडिओमुळं प्रेरणा घेतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही सोशल मीडिया यूजर्स मलायका अरोराला ट्रोल करतांना दिसत आहेत. एका यूजरनं तर कमेंट केलीय की, ‘जास्त उड्या मारू नको, म्हातारपणी एखादं हाड इकडे-तिकडे झालं तर खूप त्रास होईल.’

तर एका यूजरनं मलायकाला ट्रोल करत, हा स्टंट पाहून हिला आता पुढील वर्षी ऑलंपिक स्पर्धेत पाठवावं लागेल, असंही म्हटलं.

मलायका अरोरा आपल्या फोटोंसोबतच तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्यावरूनही खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दोघांना एकत्र एका पार्टीमधून निघतांना बघितलं गेलं होतं. रात्री उशीरा पार्टीतून निघतांना मलायका, अर्जुन कपूर, करीना कपूर आणि सैफ अली खान एकत्र दिसले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी