‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकावर भडकली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली- थोबाडीत मारणं योग्य नाही

बी टाऊन
Updated Jul 10, 2019 | 20:29 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीचा चित्रपट ‘कबीर सिंग’मधील काही दृश्यांमध्ये पुरूषप्रधान मानसिकता दाखवली गेलीय. दिग्दर्शक संदीप रेड्डींनी या दृश्यांना योग्य म्हटलंय. मात्र त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Kabir Singh
‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकावर भडकली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीचा 'कबीर सिंग' २१ जूनला रिलीज
  • संदीप रेड्डीनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने केली २५० कोटींची कमाई
  • रेड्डींच्या वक्तव्यावर रेणूक शहाणे चिडली

मुंबई: शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीचा चित्रपट ‘कबीर सिंग’नं बॉक्स ऑफिसवर यशाचं नवीन शिखर गाठलंय. कबीर सिंग २०१९ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. सोबतच शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट कबीर सिंग ठरलाय. दरम्यान, या चित्रपटावरून खूप वादविवाद सुरू आहेत. कबीर सिंगमध्ये असे काही दृश्य आहेत ज्यात समाजातील पुरूषप्रधान संस्कृतीला अजून वाव मिळू शकतो. या दृश्यांबद्दल बोलताना दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी प्रेमात थोबाडीत मारणं चालतं म्हणत दृश्यांची पाठराखण केलीय. तर आता संदीप रेड्डींच्या या वक्तव्यावरून बॉलिवूडची अभिनेत्री रेणूका शहाणे चांगलीच तापली आहे.

रेणूका शहाणेनं रेड्डी यांच्यावर कडाडत म्हटलंय, ‘जसं संदीप रेड्डी म्हणत आहेत तसंच आपल्या समाजाताही बघायला मिळतं. आपण ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. त्यावर हक्क गाजवतो आणि रागही काढतो. पण कुणावर हात उगारनं आदर्श नाही. त्यात आदर नाही तर ती घृणास्पद वागणूक आहे. हिंसा कुठल्याही प्रकारची असो ती चुकीचीच आहे. आपण हिंसेचं समर्थन करूच शकत नाही आणि नात्यात तर अजिबात नाही. कारण असं वागून आपण त्या नात्यातील विनम्रता घालवतो. ही स्वातंत्र्याची गोष्ट नाही. मी आणि माझे पती खूप प्रामाणिकपणे आपलं नातं सांभाळतो. आम्ही एकमेकांसोबत सर्व काही शेअर करतो. आमच्याजवळ स्वातंत्र्य आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही की आपला राग एकमेकांवर हिंसेद्वारे काढला जावा. ही गोष्ट मला योग्य वाटत नाही.’

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Goaaaah!

A post shared by Renuka Shahane (@renukash710) on

 

रेणूका पुढे म्हणाली, ‘आपण याला पझेसिव्हनेसचं नाव देऊ शकत नाही. हे गैरवर्तनच आहे. मात्र आपल्याकडे विनाकारण या हिसेंला स्वीकारावं असा दबाव टाकला जातोय. जेव्हा कुणीही याचा विरोध करतो तेव्हा हिंसा करणारा व्यक्ती याला प्रेमाचं नाव देतो. आपण समजत नाहीय की, याचा अर्थ रस्त्यानं येणं-जाणं करणाऱ्या मुलींना-तरुणींना लोकं स्टॉक करतात. म्हणतात की आमचं प्रेम आहे. त्यांना स्वीकारायचं का? जेव्हा अशा लोकांना तरुणी नकार देतात तेव्हा त्यांच्यावर अॅसिड अॅटॅक केला जातो किंवा तरुणींना आपली शाळा-कॉलेज बदलावं लागतं. ही मानसिकता समाजासाठी चांगली नाही. मग कशाला आपण अशा समाजाचं, अशा वागणुकीचं समर्थन करावं.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकावर भडकली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली- थोबाडीत मारणं योग्य नाही Description: शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीचा चित्रपट ‘कबीर सिंग’मधील काही दृश्यांमध्ये पुरूषप्रधान मानसिकता दाखवली गेलीय. दिग्दर्शक संदीप रेड्डींनी या दृश्यांना योग्य म्हटलंय. मात्र त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola