Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल

बी टाऊन
Updated Jul 12, 2019 | 15:45 IST

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

sonakshi sinha
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात गुन्हा दाखल
  • उत्तर पोलिसांची सोनक्षीविरोधात कारवाई
  • सोनाक्षीवर फसवणूकीचा गुन्हा

उत्तर प्रदेशः  बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. उत्तर प्रदेश पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधल्या एका कार्यक्रमासाठी २४ लाख रूपये घेऊन सुद्धा सोनाक्षीनं परफॉर्म न केल्यानं तिच्या पुढे ही अडचण निर्माण झाली आहे. दबंग अभिनेत्रीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. 

तपास आणि चौकशीसाठी उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईला सोनाक्षीच्या घरी गेले. समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा यूपीचे पोलीस सोनाक्षीच्या घरी गेले तेव्हा ती घरी नव्हती. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस पुन्हा परतले. आता पुन्हा उत्तर प्रदेशचे पोलीस सोनाक्षीच्या घरी जाणार आहेत. 

माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादच्या काटघर पोलीस स्टेशनमध्ये सोनाक्षी सिन्हाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोनाक्षीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि भारतीय दंड संहिता ४०६ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याचं बघताच उत्तर प्रदेशचे पोलीस गुरूवारी  मुंबईत दाखल झाले. त्यानंतर मुंबईत जुहू पोलिसांच्या मदतीनं सोनाक्षी सिन्हाच्या घरी स्टेटमेंट घेण्यासाठी पोहोचले. उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी, सोनाक्षीच्या घरी गेले तेव्हा ती घरात उपस्थित नव्हती. त्यानंतर पोलिसांनी खूप वेळ तिची वाट पाहिली पण ती आली नाही. आता उत्तर प्रदेशचे पोलीस पुन्हा तिच्या घरी जाणार आहेत. 

दुसरीकडे या कारवाईवर सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरनं वक्तव्य केलं आहे. मॅनेजरनं सांगितलं की, सोनाक्षी सिन्हावर लावलेले आरोप खोटे आहेत. स्पोकपर्सननं एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ९ वर्षांच्या करिअरमध्ये सोनाक्षी सिन्हावर कोणतेही आरोप लागले नाही आहेत. या आरोपातून तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे निराधार आहेत. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सोनाक्षी सिन्हा सलमान खानचा दबंग ३ या सिनेमात दिसणार आहे. सध्या सोनाक्षी या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. एवढंच नाही तर सोनाक्षी लवकरच खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल या सिनेमात दिसेल. मिशन मंगल हा सिनेमा १५ ऑगस्टला आणि खानदानी शफाखाना २ ऑगस्टला रिलीज होईल.

कलंकच्या भूमिकेसाठी नाराज

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या कलंक सिनेमात सोनाक्षीनं भूमिका साकारली. कलंकच्या प्रमोशनमध्ये जेव्हा सोनाक्षीला विचारलं गेलं की सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिचा अनुभव कसा होता, तर सोनाक्षीनं म्हटलं की माझ्या जखमेवर मीठ चोळू नका. कारण सोनाक्षीला यात माधुरी सोबत डान्स करण्याची संधी मिळाली नाही. तसंच आलिया भट्टच्या रोलमुळे आलियाला डान्सची संधी मिळाली पण तिला नाही. त्यामुळं तीनं आपली नाराजी व्यक्त केली. मात्र माधुरी दीक्षित सोबत स्क्रीन शेअर केल्याचा तिला आनंद आहे, असंही ती म्हणाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल Description: Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola