Sushmita Sen-Rohman Shawl Breakup update : सुष्मिता सेनने तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर पोस्ट शेअर केली. सुष्मिता म्हणते, ते यापुढेही चांगले मित्र राहतील, मात्र, त्यांच्या ब्रेकअपचे कारण समजू शकलेले नाही. रात्री उशिरा सुष्मिताने एक नवीन पोस्ट लिहिली. त्यात तिने स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. फोटोत सुष्मिताचा चेहरा अर्धा झाकलेला आहे. (Bollywood actress Sushmita Sen shared a post after the breakup, fans said - You are a strong woman)
सुष्मिताने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले- 'शांतता म्हणजेच मनाचं सौंदर्य आहे. माझे तुमच्यावर प्रेम आहे, आणि कायम राहिल. सुष्मिताच्या या पोस्टवर तिची वहिनी चारू असोपा हिने हार्ट इमोटिकॉन बनवला आहे. सुष्मिताच्या चाहत्यांनीही अनेक कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले- 'मनाची शांती असणे महत्त्वाचे आहे.' आणखी एका यूजरने लिहिले - 'तू खूप सुंदर आणि एक सशक्त महिला आहेस.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे, 'खूप खूप प्रेम आणि आदर. तू माझा आदर्श आहेस.
गुरुवारी सुष्मिताने तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केले आहे. इन्स्टाग्रामवर रोहमनसोबतचा तिचा फोटो शेअर करून याला दुजोरा देत अभिनेत्रीने लिहिले की, "आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली होती आणि आम्ही मित्रच राहू. हे नाते फार पूर्वी संपले आहे... हे प्रेम कायम राहील." तिच्या पोस्टमध्ये सुष्मिताने हार्ट इमोजीसह अनेक हॅशटॅग वापरले आहेत आणि शेवटी लिहिले - 'माझं तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे'
याआधी चाहते त्यांच्या लग्नाच्या बातमीची वाट पाहत होते. एका मुलाखतीत रोहनला त्याच्या आणि सुष्मिताच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते "तेव्हा तो म्हणाला होता, 'सुष्मिता, तिच्या मुली (राइन आणि अलिसा) आणि मी एका कुटुंबासारखे आहोत. कधी मी त्या मुलींच्या वडिलांसारखा असतो, कधी मी त्यांच्या मित्रासारखा असतो तर कधी आम्ही भांडतो.आम्ही एका कुटुंबाप्रमाणे जगतो आणि आनंद घेतो. त्यामुळेच तुम्ही लग्न कधी करणार यासारख्या प्रश्नांकडे आम्ही लक्ष देत नाही. लग्न झाल्यावर आम्ही ते लपवणार नाही. सध्या आम्ही त्याच्या वेब सीरिजच्या यशाचा आनंद घेत आहोत. पुढे काय होईल याचा विचार नंतर करू."
सुष्मिता सेन 46 वर्षांची आहे तर रोहमन 30 वर्षांचा आहे. सुष्मिताला राइन आणि अलिसा या दोन मुली आहेत, ज्यांना अभिनेत्रीने दत्तक घेतले होते. सुष्मिताने रिनीला 2000 मध्ये दत्तक घेतले जेव्हा ती स्वतः 24 वर्षांची होती. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी दुसरी मुलगी अलिसा हिला दत्तक घेतले.