Bollywood actresses trolled for their saree looks : कियारा अडवाणी ते दीपिका पदुकोण, या बॉलीवूड अभिनेत्रींना त्यांच्या साडी लुकमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले

बी टाऊन
Updated Jun 16, 2022 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood actresses trolled for their saree looks : या बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या साडी लूकने प्रेक्षकांवर छाप पाडण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांच्या साडीलूकमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला. त्यांच्या साडीवरून, साडी नेसल्यावर त्यांच्या चालवण्यावरून नेटिझन्सनी या अभिनेत्रींना ट्रोल केले.

Bollywood actresses have been heavily trolled for their sari looks
साडीमुळे या अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • साडीलूकमुळे या अभिनेत्रींना ट्रोल करण्यात आले
  • कियारा अडवाणीपासून दीपिका पदुकोणपर्यंत या 5 अभिनेत्री साडी नेसल्यामुळे ट्रोल झाल्या
  • सोशल मीडिया ठरतोय सेलिब्रिटींची डोकेदुखी?

Bollywood actresses trolled for their saree looks : या  बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या साडी लूकने प्रेक्षकांवर छाप पाडण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांच्या साडीलूकमुळे 
त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला. त्यांच्या साडीवरून, साडी नेसल्यावर त्यांच्या चालवण्यावरून नेटिझन्सनी या अभिनेत्रींना ट्रोल केले 

कियारा अडवाणीच्या काळ्या साडीला नेटकऱ्यांनी चीप साडी असल्याचं म्हटलं आहे.

Kiara Advani's black saree called cheap by the netizens

ब्लॅक साडीत जबरदस्त दिसणाऱ्या कियारा अडवाणीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. नेटिझन्सच्या म्हणण्यानुसार ती साडी इतकी कमी गुणवत्तेची आणि ची होती. जास्त अंगप्रदर्शन केल्याने तिची निंदा करण्यात आली. मात्र, कियारा या लूकमध्ये  सुंदर दिसत असल्याने तिचे चाहते त्यांचे लक्ष हटवू शकले नाहीत.


प्रियांका चोप्राने ब्लाऊजलेस होत फोटोशूट केले, आणि ट्रोल झाली

Priyanka Chopra just created history by donning a SARI for the cover of an international magazine - Times of India
फोटोशूटसाठी ब्लाउजलेस साडी नेसल्याबद्दल प्रियंका चोप्राची जोरदार निंदा झाली होती. ब्लाउजलेस साडीत फोटोशूट केल्याबद्दल नेटिझन्स ग्लोबल आयकॉनवर प्रचंड संतापले होते आणि तिला तिची संस्कृती विसरल्याबद्दल आणि भारतीय परंपरेचे पाश्चिमात्यकरण करून अनादर केल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले. 

बोल्ड आणि काळ्या रंगाची साडी नेसल्यामुळे दीपिका पदुकोणला ट्रोल करण्यात आले. 

Deepika Padukone was badly shamed for wearing a bold black saree

दीपिका पदुकोणने काळ्या रंगाची सब्यसाचीने डिझाईन केलेली साडी नेसली होती. त्याता दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तरीही या पोशाखामुळे तिला वाईटरित्या ट्रोल करण्यात आले. कोणत्याही गोष्टीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी ट्रोल होणाऱ्या कलाकारांसाठी सोशल मीडिया डोकेदुखी ठरत आहे. 


गुलाबी साडीत नोरा फतेहीसुद्धा ट्रोल झालेली आहे

Nora Fatehi brutally trolled for this viral video; here's why! | Hindi Movie News - Bollywood - Times of India

नोरा फतेही अनेकदा तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते. गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, तिच्या चालण्यावरून तिला वाईटप्रकारे ट्रोल
करण्यात आले. तिला तिच्या रिअॅलिटी शोच्या सेटवर डान्स करून पोहोचायचे आहे का,असे नेटिझन्सने विचारले.

2019 मध्ये सोनम कपूरच्या वाढदिवसाला साडी नेसल्याबद्दल मलायका अरोराला लक्ष्य करण्यात आले होते.

Malaika Arora targeted for wearing a saree at Sonam Kapoor's birthday in 2019
मलायका अरोरा जी इंटरनेटवर ट्रोलर्सच्या सॉफ्ट टार्गेटपैकी एक आहे तिला साडी नेसल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते. सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी मलायका साडी नेसून आली होती. त्यावेळी मलायकाला तू लग्न करण्याची तयारी करत आहेस का? असं विचारण्यात आलं होतं. अर्जुन कपूरसोबत लग्नाची तारीख ठरली का असंही तिला विचारण्यात आलं होतं. वाढदिवसाच्या पार्टीला मलायका साडी नेसून आल्याने नेटिझन्सनी तिला ट्रोल केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी