बायकोबरोबर नाही तर सासू 'डिंपल कपाडिया'बरोबर डेटवर जायचे होते 'अक्षय कुमार'ला...

बी टाऊन
Updated May 30, 2021 | 17:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshay Kumar wanted to take mother in law Dimple Kapadia on a date अक्षय कुमारच्या आयुष्यातील आणखी एक सिक्रेट समोर आले आहे. ट्विंकलबरोबर नाही तर सासू डिंपलबरोबर डेटवर जाण्याचीअक्षय कुमारची इच्छा होती.

Akshay Kumar
अक्षय कुमारची डेटची इच्छा 

थोडं पण कामाचं

  • नेमके काय झाले होते
  • करणे सेनेने दिली धमकी
  • पद्मावतची करून दिली आठवण

नवी दिल्ली : बॉलीवूडचा (Bollywood) 'खिलाडी' म्हणजेच 'अक्षय कुमार' (Akshay Kumar) आज सिने जगतातील एक टॉप स्टार (Top Film Star)आहे. करियरच्या सुरूवातीच्या दिवसांपासूनच अक्षय कुमारच्या खासगी आयुष्याची नेहमी चर्चा होत राहिली आहे. अक्षय कुमारचे नाव बॉलीवूडमधील अनेक नट्यांबरोबर (Affairs of Akshay Kumar) जोडले गेले होते. अखेर २००१ मध्ये अक्षय कुमारने राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची मुलगी ट्विंकल खन्नाशी (Twinkle Khanna) लग्न केले होते. त्यानंतरही अक्षय कुमारच्या लग्नाआधीच्या (Akshay Kumar  Marriage)अफेअर्सचे किस्से अधूनमधून समोर येत असत. आता मात्र अक्षय कुमारच्या आयुष्यातील आणखी एक सिक्रेट समोर आले आहे. अक्षय कुमार आपली पत्नी ट्विंकलबरोबर नाही तर सासू डिंपलबरोबर डेटवर (Date with Dimple Kapadia) जाऊ इच्छित होता. (Bollywood  : Akshay Kumar wanted to take mother in law Dimple Kapadia on a date )

नेमके काय झाले होते


एका मुलाखतीत अक्षय कुमारला जेव्हा विचारण्यात आले की त्याला कोणत्या बॉलीवूड नटीला रात्रीच्या रोमॅंटिक डेटवर घेऊन जायला आवडेल? या प्रश्नावर खिलाडी अक्षय कुमारने न संकोचता सांगितले की मला अशा रोमॅंटिक डेटवर डिंपल कपाडियाला घेऊन जायला आवडेल. पुढे अक्षय कुमार असेही म्हणाला की मला डिंपलला अशासाठी डेटवर घेऊन जायला आवडेल की त्यामुळे मला रात्रभर त्यांच्या मुलीबाबत म्हणजे ट्विंकलबाबत बोलता येऊ शकेल.

करणे सेनेने दिली धमकी


अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज'संदर्भात वाद सुरू झाला आहे. राजपूत करणी सेनेला या चित्रपटाच्या शीर्षकावर (टायटल) आक्षेप आहे. करणी सेनेच्या युवा विंगचे अध्यक्ष आणि चित्रपटनिर्माते सुरजीत सिंह राठोड यांचे म्हणणे आहे की जर हा चित्रपट महान राजा पृथ्वीराज चौहानवर आधारित आहे तर चित्रपटाचे नाव फक्त पृथ्वीराज कसे ठेवता येऊ शकते. आमची इच्छा आहे की चित्रपटाचे शीर्षक त्यांच्या पूर्ण नावानिशी असावे म्हणजेच पृथ्वीराज चौहान असे असावे. यामुळे पृथ्वीराज चौहानांना योग्य तो सन्मान दिला असे होईल.

पद्मावतची करून दिली आठवण


करणी सेनेने धमकी देताना शीर्षक बदलण्याबरोबरच आणखीही काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी मागणी केली आहे की चित्रपट प्रदर्शित करण्याआधी त्यांच्यासाठी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग झाले पाहिजे. सुरजीत सिंह राठोड म्हणाले की 'जर चित्रपट निर्मात्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्यांचा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्यावेळीदेखील चित्रपटाच्या शीर्षकावरूनच वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांना त्या परिणामांसाठी तयार राहावे लागेल.'

अक्षय कुमारचे अनेक चित्रपट पुढील काळात येऊ घातले आहेत. यात सुर्यवंशी, पृथ्वीराज, बेल बॉटम, अतरंगी रे, बच्चन पांडे आणि रामसेतु या चित्रपटांचा समावेश आहे. सुर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कॅटरिन फैफ प्रमुख भूमिकेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी