Kajal Aggrawal: काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म 

Kajal Aggrawal Baby Boy | : साउथ आणि बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान अभिनेत्री तिचा पती गौतम सोबत मातृत्वाचे सुवर्ण क्षण घालवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Bollywood and south actress Kajal Aggarwal blessed baby boy 
काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम यांना मुलगा झाला आहे.
  • काजल अग्रवालने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती.
  • ३० ऑक्टोबर २०२० रोजी दोघांनी एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लग्न केले होते.

Kajal Aggrawal Baby Boy | मुंबई : साउथ आणि बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालच्या (Kajal Aggrawal) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान अभिनेत्री तिचा पती गौतम सोबत मातृत्वाचे सुवर्ण क्षण घालवण्यासाठी सज्ज झाली आहे. दोघेही एका मुलाचे पालक झाले आहेत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्यानंतर आता काजल आणि गौतमच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. (Bollywood and south actress Kajal Aggarwal blessed baby boy).  

अधिक वाचा : Road Accident ।  मलकापूर जवळ भीषण अपघात, ३ ठार १ गंभीर

अभिनेत्रीच्या घरी पाहुण्याचे आगमन 

काजल अग्रवालने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. काजलचा गरोदरपणाचा काळ चांगला गेला, स्वत:ला तंदुरुस्त ठेवत अभिनेत्रीने योगावर लक्ष केंद्रित केले. सोशल मीडियावर काजल अग्रवालच्या मुलाच्या जन्माची माहिती चाहत्यांना समजताच त्यांनी दोन्ही नव्या पालकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव सुरू झाला आहे. 

फेब्रुवारी महिन्यात काजल अग्रवालचा बेबी शॉवर सोहळा पार पडला. त्याचे फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. बेबी शॉवरमध्ये काजलने गुलाबी रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली होती. यासोबत तिने मॅचिंग ब्लाउज आणि पारंपरिक दागिने घातले होते. तर तिचा पती गौतम कुर्ता-पायजामा आणि जॅकेटमध्ये दिसला होता.

या जोडप्याच्या लग्नाबाबत भाष्य करायचे झाले तर, ३० ऑक्टोबर २०२० रोजी दोघांनी एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लग्न केले होते. या विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंबातील जवळचे लोक सहभागी झाले होते. गौतम आणि काजल यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि बघता-बघता दोघांच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 

लग्न करून दोघांनी कायम सोबत राहण्याचा निर्णय घेतला. काजल अग्रवाल मागील काही काळापासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता तर घरात नवीन पाहुणा आल्याने ती आणखीच व्यस्त असणार आहे. त्यामुळे सध्यातरी ती आणखी काही काळ इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा विचार करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी