चंडीगड : भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर मल्टीपल मायलोमा या आजाराने त्रस्त आहेत. मायलोमा हा ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे. किरण खेर यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत.
चंदीगडमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार किरण खेर मल्टीपल मायलोमा या आजाराने त्रस्त असल्याचे समजते. मायलोमा हा ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे. किरण खेर सध्या मुंबईत उपचार घेत आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्सकडून केला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार चंदिगडमध्ये बुधवारी खास आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करतांना चंदीगडचे भाजप अध्यक्ष अरुण सूद म्हणाले की, 68 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री-नेत्या-राजकारणी किरण खेर यांच्या आजारपणाविषयी माहिती मिळाली आहे. चंदीगड भाजपा अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी अभिनेत्रींना या आजाराबद्दल माहिती मिळाली होती, त्या अभिनेत्री सध्या मुंबईत उपचार घेत आहे.
अरुण सूद म्हणाले, "गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना आपल्या चंदीगड येथील घरात हात फ्रॅक्चर झाला होता. चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मल्टीपल मायलोमा आढळला. हा आजार त्याच्या डाव्या हाताला आणि उजव्या खांद्यावर पसरला होता. उपचारासाठी त्यांना 4 डिसेंबरला मुंबईला नेण्यात आले आहे. "