Mahesh babu : मुंबई : बॉलिवूडवाल्यांना मी परवडणार नाही असे विधान साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने केले आहे. तसेच मला अखिल भारतीय स्टार होण्यात काही रस नाही असेही महेश बाबु म्हणाला आहे. शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित मेजर या सिनेमाची निर्मिती महेश बाबू यांनी केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी ते बोलत होते.
Our meeting is confirmed in theatres on May 12th!
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) May 2, 2022
Here's the trailer of #SarkaruVaariPaatahttps://t.co/r874NLN0FT@KeerthyOfficial @ParasuramPetla @MusicThaman @madhie1 @GMBents @MythriOfficial @14ReelsPlus @saregamasouth
महेश बाबू म्हणाला की मला संपूर्ण भारताचा स्टार होण्यात कुठलाही रस नाही. उलट दक्षिण भारातातील अनेक सिनेमे संपूर्ण देशात हिट झाले आहेत. मला सुरूवातीपासून तेलुगू सिनेमे करायचे होते. मी केलेले चित्रपट सर्व भारतीयांनी पहावे अशी आपली इच्छा होती असेही महेश बाबु म्हणाला. गेल्या काही वर्षांत तेलुगु सिनेमांनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यामुळे भारतीय सिनेमाची व्याख्या बदलल्याचेही महेश बाबूने सांगितले.
Proud to be bringing the story of one man who became the nation's saviour in its darkest times.
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) May 9, 2022
Here's the #MajorTrailer https://t.co/5ahEkH7hIC @AdiviSesh @saieemmanjrekar #SobhitaD @SashiTikka @sonypicsfilmsin @GMBents @AplusSMovies
बॉलिवूडमध्ये कधी काम करणार या प्रश्नावर महेश बाबू म्हणाला की, बॉलिवूडवाल्यांना मी परवडणार नाही. त्यासाठी मी उगाच वेळ वाया घालवणार नाही. तेलुगु सिनेमा ही माझी ताकद आहे आणि तेलुगु सिनेमांनी बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या सीमा तोडल्या आहेत. तेलुगु सिनेमाने जे मला स्टारडम दिले आहे याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी एखादा सिनेमा बनवेन आणि लोकांना खूप आवडेल असे माझे स्वप्न होते, हे स्वप्न आज साकार झाले आहे असेही महेश बाबू म्हणाला.