मोदींच्या विजयानंतर बॉलिवूडकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

बी टाऊन
Updated May 24, 2019 | 17:08 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्ग मोदींचं अभिनंदन केल.

narendra modi
नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबईः लोकसभा निवडणूक २०१९मध्ये भारताच्या जनतेने भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे. ५४२ मतदारसंघापैकी भाजपप्रणित एनडीएला ३४९ तर काँग्रेसप्रणित यूपीएला ८१ जागा मिळाल्या. जनतेने पुन्हा एकदा सत्तेची चावी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती दिली आहे. मोदींच्या विजयानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. बॉलिवूडकरांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रत्येकजण आपापल्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अभिनंदन करत आहेत. बॉलिवूड कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

दाक्षिणात्य सिनेमांचे सुपरस्टार थलायवा रजनीकांत यानींही मोदींच्या विजयानंतर त्यांचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. रजनीकांत म्हणाले, “मनापासून आपले अभिनंदन, तुम्ही करून दाखवलं, देव तुमचं भलं करो.”

 

बॉलिवुडचे महान कलाकार अनुपम खेर यांनीही गुरुवारी सकाळी ट्विट करून लोकसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या जवळ जात असल्याचा विश्वास प्रकट केला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आईचा व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांच्या आई नरेंद्र मोदी याचे अभिनंदन करत आहेत. “मैने बोला था..” त्या हे वाक्य बोलताना दिसत आहेत. ते पुढे लिहितात, मिळालेल्या विजयाचा अर्थ लावणं तीच्यासाठी कठीण आहे. तिने हा विजय वैयक्तिकरित्या घेतला आहे. पण संपूर्ण देश भारतीय जनता पार्टीचा हा विजय स्वतःचा विजय समजत आहेत

अजय देवगण यांनी लिहीले, देशाला माहीत आहे त्यांच हित कशामध्ये आहे आणि त्यांनी त्यांची निवड केली आहे. @narendramodi

 

 

तसेच महान गायिका आशा भोसले यांनीही ट्विट करून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्या लिहितात, “भारताच्या मतदात्यांनी शहाणपणाने मतदान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन तसेच सर्व भाजप कार्यकर्त्याचे अभिनंदन ज्यांनी हा विजय मिळवण्यासाठी, आपल्या देशाला एक सुवर्ण स्वप्नाची दिशा देण्यास मोलाची कामगिरी केलेल्या सर्वांचे अभिनंदन. जय हिंद”

 

स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने ट्वीट करून पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते लिहितात, “देशाने निर्णय घेतला आहे, लोकशाहीचा उत्सव साजरा केला गेला पाहिजे. नरेंद्र मोदी यांना या भव्य विजयाच्या खूप शुभेच्छा. ”

दिग्गज बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी सनी देओल आणि मोदींचा फोटो शेअर करत ट्वीट केले. ते म्हणाले,फकिर बादशाह मोदीजी, धरती पुत्र सनी देओल, अभिनंदन. अच्छे दिन आयेंगे. ”

तसेच हेमा मालिनी ज्या मथुरेतून भाजपच्या पक्षातून निवडणूक लढल्या, त्यांनीही नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या लिहितात, “ अभूतपूर्व यश, विरोधीपक्षाला पूर्णपणे शांत केलंत मोदीजी, तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, अपमान केला गेला, वैयक्तिक आरोप केले गेले. पण तुम्ही या सगळ्याकडे लक्ष न देत आपल्या देशभक्तीसाठी उभे राहिलात. ज्यावर देशाच्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे.

तसेच बॉलिवूडचे महान दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ट्विटरवर मोदींसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. भांडारकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आपणास या विजयाच्या हार्दिक  शुभेच्छा.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मोदींच्या विजयानंतर बॉलिवूडकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव Description: बॉलिवूड कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्ग मोदींचं अभिनंदन केल.
Loading...
Loading...
Loading...