Nude Photoshoot रणवीरच नाही तर या सेलिब्रिटींनीही केले आहे न्युड फोटो शूट

नुकतंच रणवीर सिंहने एक न्युड फोटो शूट करून हलकल्लोळ माजवला आहे. फक्त रणवीरच नाहीतर असे अनेक सेलिब्रिटी आहेत त्यांनी यापूर्वी न्युड फोटो शूट केले होते आणि खळबळ माजवून दिली होती.

ranveer nude photoshoot
रणवीर न्युड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुकतंच रणवीर सिंहने एक न्युड फोटो शूट करून हलकल्लोळ माजवला आहे.
  • फक्त रणवीरच नाहीतर असे अनेक सेलिब्रिटी आहेत
  • त्यांनी यापूर्वी न्युड फोटो शूट केले होते आणि खळबळ माजवून दिली होती.

Celebrity Nude Photoshoot : मुंबई : नुकतंच रणवीर सिंहने (Ranveer Singh) एक न्युड फोटोशूट (Nude Photoshoot) करून हलकल्लोळ माजवला आहे. फक्त रणवीरच नाहीतर असे अनेक सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आहेत त्यांनी यापूर्वी न्युड फोटो शूट केले होते आणि खळबळ माजवून दिली होती. (bollywood celebrity nude photo shoot ranveer sing esha gupta and sherlyn chopra)

अधिक वाचा : 68 National Film Awards 2022 : सूरराई पोट्रू चित्रपटाची कथा या व्यक्तीच्या जीवनावर,हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार साकारणार भूमिका

रणवीर सिंह


Ranveer Singh

रणवीर सिंहने फार कमी वेळेत हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. बाजीरा मस्तानी, पद्मावत, गली बॉय सारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आता एका मासिकासाठी त्याने न्युड फोटोशूट केले आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अधिक वाचा : National Film Awards 2022 : अजय देवगण-सुर्या सर्वोत्कृष्ट अभिनेता, 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

ईशा गुप्ता


आपल्या बोल्ड अभिनयासाठी अभिनेत्री ईशा गुप्ता  (Esha Gupta) ओळखली जाते. फक्त ऑनस्क्रीन नव्हे तर इन्स्टाग्रामवर ईशा सक्रिय असते आणि आपले हॉट फोटो पोस्ट करत असते. ईशाने एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा सेमी न्युड आणि टॉपलेस अवतारात फोटो काढले होते आणि ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

अधिक वाचा : Khatron Ke Khiladi 12: एलिमिनेशनबद्दल ऐकलं अन् अभिनेत्री बेभान होऊ नाचली!

कल्कि कोचलिन


देव डी, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि गली बॉयमध्ये कल्किने (Kalki Koechlin) खुप चांगले काम केले आहे. २०१७ मध्ये कल्किने न्युड फोटोशूट केले होते. या फोटोमुळे लोक आश्चर्यचकित झाले होते.

अधिक वाचा : Reena Roy daughter : रीना रॉयची मुलगी सनम खानच्या सौंदर्यापुढे स्टार किड्सही फिके,फोटो झाला व्हायरल

शर्लिन चोपडा

मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) आपल्या हॉट सिनेमा कामसूत्र 3D साठी ओळखली जाते. शर्लिन ही एकमेव भारतीय स्त्री आहे जिचा फोटो आतंरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले मासिक प्ले बॉय मासिकात छापले होते. यात तिचे अनेक न्युड फोटो छापण्यात आले होते.

अधिक वाचा : Kangana Ranaut कशी बनली इंदिरा गांधी?, Emergency च्या फर्स्ट लुकचा मेकिंग व्हिडिओ आऊट

पूजा बेदी

अभिनेत्री पूजा (Pooja Bedi)ने एका कंडोमच्या जाहिरातीसाठी न्युड फोटोशूट केले होते. पुजाने ९० च्या दशकात हे फोटो शूट केले होते त्यामुळे एकच गदारोळ झाला होता. ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता आणि महिनाभरात या  जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी