Bollywood News : सोशल मीडिया (Social media ) हे एक असं माध्यम आहे जिथे नेहमीच काही ना काही घडत असते. बॉलिवूडच्या अभिनेत्री (Bollywood Actress ) आणि अभिनेत्यांचे फोटोज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉलिलूड कलाकारांचे बालपणीचे फोटो (Actress childhood photo ) सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा सध्या ट्रेंड आहे. विशेष म्हणजे, यातले काही फोटो सहज ओळखता येतात तर काही फोटो ओळखणे खूपच कठीण होते. ( Bollywood Dabang Actress Twinkle Khanna seen in the photo )
असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री. हा फोटो तिच्या शाळेतील दिवसांचा आहे. या फोटोत ही अभिनेत्री तिच्या वर्गातील मित्रमैणींसोबत आणि शिक्षकांसोबत आहे. शाळेच्या या ग्रुप फोटोमध्ये तुम्ही तिला ओळखू शकताय का?
अधिक वाचा : ही लक्षणं दिसली तर लगेच थांबवा मद्यपान
शाळेतील दिवसांचा हा फोटो असून फोटोत अभिनेत्री वरून तिसऱ्या रांगेत उभी आहे. अजूनही ओळखणं कठीण असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की शिक्षकांसोबत उभी असलेली ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना. ट्विंकल खन्नाचा हा फोटो तिच्या शालेय दिवसांमधील आहे. शाळेत असताना ट्विंकल खन्नाचा टॉम बॉय लूकमध्ये राहणं आवडत असे.
अधिक वाचा : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म
ट्विंकल खन्ना ही बॉलिवूडचे फर्स्ट सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ट्विंकल खन्नाने बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमा केलेले नाहीत. मात्र, तरीही ट्विंकल खन्नाला बॉलिवूडची दबंग अभिनेत्री मानले जाते. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. ट्विंकल खन्ना कोणत्याही मुद्द्यावर बिंधास्तपणे स्वत:चं मत मांडते. ट्विंकल खन्नाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केलेलं आहे. आपण ट्विंकलला घाबरतो, असे स्वत: अक्षय कुमारनेही गंमतीत कबूल केलेले आहे. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना दोन मुलं आहेत. ट्विंकल खन्ना आता सिनेमांमध्ये काम करत नसली तरी बॉलिवूडमधील प्रत्येक अपडेट तिला असतात हेच तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरूनही दिसून येते.