वयाच्या २६ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गजाचा आज वाढदिवस

बी टाऊन
Updated May 25, 2019 | 15:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Happy Birthday Karan Johar: चित्रपट निर्माता करण जोहरचा आज ४७ वा वाढदिवस आहे. करण जोहर एक प्रसिद्ध निर्माता आहे. करणच्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील काही खास किस्से.

Karan Johar and Shahurkh Khan
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: चित्रपट निर्माता करण जोहर आज ४७ वर्षांचा झालाय. करण बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अशा निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यानं आपल्या करिअरची सुरूवात २१ वर्षांपूर्वी चित्रपट ‘कुछ कुछ होता है’पासून केली होती. करणनं दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला बेस्ट डिरेक्टरचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला होता. दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरूवात करण्याऱ्या करणनं काही चित्रपटांमध्ये लहान-लहान भूमिका पण केल्या. तसंच नंतर तो चित्रपट निर्माता झाला.

कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान आणि स्टुडंट ऑफ द इअर, बॉम्बे टॉकीज आणि ऐ दिल है मुश्किल सारखे करणचे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आपल्या कामाबद्दल नेहमी कौतुक ऐकणाऱ्या करणला त्याच्या सेक्शुअल स्टेटसबद्दल नेहमी टीका सहन करावी लागलीय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Koffee Jury!!!! @thehouseofpixels styled by @nikitajaisinghani in @Gucci

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

 

 

करणनं आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यानं वयाच्या २६ व्या वर्षी आपली व्हर्जिनिटी गमावली होती. त्यानं सांगितलं, १९९८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’नंतरची ही घटना आहे. करण म्हणाला होता, तो त्याच्या शरीराबद्दल आनंदी नव्हता आणि जेव्हा त्याचा शरीराबद्दलचा आत्मविश्वास वाढला तोपर्यंत खूप काळ निघून गेला होता. करणनं मुलाखतीत सांगितलं होतं की, लठ्ठ असल्याकारणानं त्याला त्याचं शरीर आवडत नव्हतं. मी कुणालाही अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, असं करण म्हणाला होता आणि म्हणूनच पहिल्यांचा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यानं समोरच्या व्यक्तीला ‘थँक्यू’ म्हटलं होतं.

 

खूप वर्षांपर्यंत करण जोहरचं नाव बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरूख खानसोबत जोडलं गेलं होतं. दोघं रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्यात संबंध असल्याची टीका होत होती. यावर करणनं स्वत: उत्तर दिलं होतं. करण म्हणाला होता, ‘मला होमोसेक्शुएलिटीचा पोस्टर बॉय बनवलं गेलंय, मात्र खरं तर मला याचा काहीही फरक पडत नाही. कोण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याचं मला काहीच करायचं नाही. मी स्वत:बद्दल जर स्पष्टपणे सांगितलं तर यासाठी मला तुरूंगात जावं लागेल.’

शाहरूख खानसोबतच्या नात्याबद्दलही करणनं उत्तर दिलं होतं. करण जोहर म्हणाला, ‘शाहरुख आणि माझ्या नात्याबद्दल अफवा पसरली जात आहे. या अफवेमुळे मी खूप त्रस्त झालोय. शाहरूख आणि माझ्या नात्यात खूप चढ-उतार आले. पण त्यानं काही फरक पडत नाही. तो माझ्यासाठी फादर फिगर आणि मला मोठ्या भावासारखा आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वयाच्या २६ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गजाचा आज वाढदिवस Description: Happy Birthday Karan Johar: चित्रपट निर्माता करण जोहरचा आज ४७ वा वाढदिवस आहे. करण जोहर एक प्रसिद्ध निर्माता आहे. करणच्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील काही खास किस्से.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles