सर्वसामान्य मुलगी ते बॉलीवूडची हिट मशीनपर्यतचा प्रवास करणाऱ्या नेहा कक्करचा वाढदिवस, कसा होता हा प्रवास...

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jun 06, 2021 | 23:04 IST

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या सुप्रसिद्ध गायिकेचा (Popular Singer) आज ३३वा जन्मदिवस (Neha Kakkar's Birthday) आहे.

Neha Kakkar's Birthday
नेहा कक्करचा वाढदिवस 

थोडं पण कामाचं

  • असे उघडले नेहा कक्करचे नशीब
  • आईवडीलांची आर्थिक परिस्थिती होती बेताची
  • बहिणच आहे नेहाची गुरू

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. नेहा कक्कर आज संगीत जगतातील (Music Industry) आघाडीच्या गायिकांपैकी एक गायिका आहे. तरुण पिढीत नेहाची गाणी लोकप्रिय आहेत. अशा या सुप्रसिद्ध गायिकेचा (Popular Singer) आज ३३वा जन्मदिवस (Neha Kakkar's Birthday) आहे. आपल्या गायनाच्या जोरावर नेहा मागील काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये (Bollywood)सातत्याने लोकप्रिय गाणी देत आली आहे, त्यामुळचे तिला हिट मशीनदेखील (Hit Machine of Bollywood) म्हणता येईल. गाण्यांबरोबरच आपल्या स्माईलने आणि बोलण्याने नेहा अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. नेहाच्या आवाजाची तरुण पिढी मोठी फॅन आहे. तिची गाणी रिलीज झाल्याबरोबर व्हायरल (viral) होतात. सध्या नेहा कक्कर इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) या लोकप्रिय रिअॅलिटी शो मध्ये पंचाच्या भूमिकेत दिसते आहे. अर्थात मागील काही काळापासून ती या शोमध्ये दिसलेली नाही. (How Neha Kakkar become the hit machine of Bollywood)

असे उघडले नेहा कक्करचे नशीब


बॉलीवूडमध्ये यश कमावण्याआधी नेहा आणि तिची बहिण जागरण किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन गायच्या. मात्र त्यानंतर करियर घडवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून नेहाने इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनमध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला. त्यानंतर मात्र नेहाचे नशीब खुलले. नेहाला एकामागोमाग एक संधी मिळत गेल्या आणि यश मिळत गेले. तिची गाणी लोकप्रिय झाली आणि ती चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाली. आज नेहाला बॉलीवूडची हिट मशीन म्हटले जाते. अर्थात हे यश मिळण्याआधीचा तिचा प्रवास खडतर होता. एक वेळ अशी होती की नेहाचे आईवडीलच तिला जन्म देण्यास इच्छुक नव्हते. नेहाचा भाऊ टोनी कक्करने या बाबतचा खुलासा केला होता.

आईवडीलांची आर्थिक परिस्थिती होती बेताची


टोनी कक्करने काही दिवसांपूर्वीच नेहाच्या जन्माबद्दलची ही गोष्ट सांगितली होती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे नेहाचे आईवडील तिसऱ्या अपत्याला जन्म देऊ इच्छित नव्हते. हे तिसरे अपत्य दुसरे तिसरे कोणी नसून नेहाच होती. मात्र आठ आठवडे उलटून गेलेले असल्यामुळे नेहाची आई अॅबॉर्शन करू शकत नव्हती. त्यामुळे नेहाला जन्म देण्याशिवाय तिच्या आईवडिलांसमोर पर्याय नव्हता. नेहा कक्कर आणि तिची बहिण सोनू कक्कर लहानपणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन गायच्या. दोघींनीही बराच काळ भजन गाऊन पैसा कमावला.

बहिणच आहे नेहाची गुरू


सोनू ही एकप्रकारे नेहाची गुरूच होती. नेहा तिच्या मार्गदर्शनाखालीच गाणे शिकायची. इंडियल आयडॉल या गाण्याशी संबंधित रिअॅलिटी शोने मात्र नेहाचे नशीब पालटले. नेहाने या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर ती चर्चेत आली. जरी नेहा या स्पर्धेत जिंकू शकली नाही तरी तिच्या गायनाच्या करियरची सुरूवात इथून झाली. नेहाने बॉलीवूडमधील आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि २००८मध्ये नेहाने आपला पहिला अल्बम, नेहा द रॉकस्टार बाजारात आणला.

नेहाची लोकप्रिय गाणी


नेहाची गाणी लोकप्रिय आहेत. तिचे कोणतेही नवे गाणे बाजारात येताच ते टॉप ट्रेंडिंगमध्ये समाविष्ट होते. सोशल मीडियावरदेखील नेहा कक्कर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिचा खूप मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर आहे. बॉलीवूडमध्ये नेहाची कारकिर्द खुलवणारे म्हणजेच नेहाच्या पहिल्या हिट गाणे म्हणजे 'सेकंड हॅंड जवानी' हे आहे. याशिवाय यारिया चित्रपटातील सनी-सनी या गाण्यामुळेदेखील नेहाला खूप लोकप्रिय मिळाली. आज नेहा यशाच्या शिखरावर आहे. अलीकडेच तिचे 'खड तेनू मैं दस्सा' हे गाणे खूप लोकप्रिय झाले आहे. या गाण्यात तिचा पती रोहनप्रीत सिंह याचादेखील आवाज आहे आणि गाण्याच्या व्हिडिओतदेखील दोघे एकत्र दिसत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी