जेव्हा राज कुंद्राने केला शिल्पा शेट्टीवर गिफ्टचा वर्षाव, पण शिल्पा म्हणाली 'आपल्यात काही नाही होऊ शकत'

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jun 08, 2021 | 18:58 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस (Shilpa Shetty Birthday), ती ४६ वर्षांची झाली. १२ वर्षांपूर्वी शिल्पाचे राज कुंद्राशी लग्न झाले होते. दोघांनीही दोन मुले आहेत, मुलगा विआन आणि मुलगी समिशा.

Shilpa Shetty Birthday
शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस 

थोडं पण कामाचं

  • शिल्पा शेट्टीची राज कुंद्राबरोबर डेटिंग
  • शिल्पाची कौटुंबिक आयुष्य
  • शिल्पाच्या करियरला कलाटणी

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस (Shilpa Shetty Birthday), ती ४६ वर्षांची झाली. १२ वर्षांपूर्वी शिल्पाचे राज कुंद्राशी लग्न झाले होते. दोघांनीही दोन मुले आहेत, मुलगा विआन आणि मुलगी समिशा. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह (Social Media) आहे. त्यामुळे ती स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बॉलीवूडच्या (Bollywood) आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये शिल्पा चांगलीच यशस्वी झाली आहे. जेव्हा राज कुंद्राशी (Raj Kundra) शिल्पाचे लग्न झालेले नव्हते आणि तो तिला खूष ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावळेचा किस्सा शिल्पाने एका मुलाखतीत सांगितला होता. तो असा की राज कुंद्राकडे शिल्पा शेट्टीच्या काही वस्तू होत्या आणि त्या परत करण्यासाठी तो लंडनहून मुंबईला आला होता. मुंबईत आल्यानंतर राज कुंद्राने शिल्पावर भेटींचा वर्षाव करण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशी त्याने शिल्पाला एक रंगीत बॅक पाठवली. दुसऱ्या दिवशी त्याने आणखी एक बॅग पाठवली. त्यानंतर मात्र शिल्पाने लगेच त्याला फोन केला आणि सांगितले की त्या दोघांचेही नाते पुढे जाऊ शकत नाही कारण तिची मुंबईहून लंडनला शिफ्ट होण्याची अजिबात इच्छा नव्हती. राज कुंद्रा त्यावेळेस लंडनमध्ये राहत होता. (How Shilpa Shetty shetty, who turned 46 today, done dating with Raj Kundra)

राज कुंद्राबरोबरचा रोमान्स

राज कुंद्रा या व्यावसायिकाशी लग्न केल्यानंतर शिल्पाच्या या निर्णयाचीही खूप चर्चा झाली होती. राज कुंद्रामुळे आयपीएलमध्येही शिल्पा शेट्टीचे नाव चर्चिले जाऊ लागले होते. राज कुंद्राबरोबरच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल शिल्पा शेट्टीने काही किस्से सांगितले आहेत. राज कुंद्राबरोबरच्या आपल्या पहिल्या डेटबद्दल सांगताना शिल्पा म्हटते की त्यावेळेस मला स्थिरस्थावर व्हायचे होते. राजने मला सांगितले की तोसुद्धा सेटल होण्याच्या विचारात आहे. त्याने मला त्याचा मुंबईतील पत्ता दिला आणि भेटीची विचारणा केली. अशा रितीने राज कुंद्राबरोबरची माझी पहिली डेट झाली.

कोरोनाचा शिल्पाच्या कुटुंबाला तडाखा

अलीकडे राज कुंद्रा आणि इतर कुटुंबिय यांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यांची चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली होती. कुटुंबात फक्त शिल्पाच एकटी होती जिला कोरोनाची बाधा झाली नव्हती. अशावेळी शिल्पाने आपल्या टीव्ही शोमधून काही काळ सुट्टी घेतली आणि कुटुंबाकडे लक्ष पुरवले. त्यांना कोरोनातून बरे करण्यावर तिने लक्ष दिले. त्यानंतर तिने सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्टदेखील शेअर केली होती. त्यात तिने कोरोना काळातील प्रेम.  कोरोना प्यार है. सर्वानाच शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, असे म्हटले होते. सोबत कुटुंबाबरोबरचा एक फोटोदेखील शेअर केला होता. 

बॉलीवूडमधील आगामी चित्रपट

लवकरच शिल्पा शेट्टी परेश रावल यांच्याबरोबर एक चित्रपटात दिसणार आहे. परेश रावल यांचा लोकप्रिय विनोदी चित्रपट हंगामाच्या पुढील भागात शिल्पा असणार आहे. त्याचबरोबर शब्बीर खानबरोबर तिचा निकम्मा हा चित्रपटदेखील येऊ घातला आहे. लंडनमध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोद्वारे शिल्पाचे झगमगत्या दुनियेत पुनरागमन झाले होते. त्यानंतर तिने अनेक रिअॅलिटी शोचे जज म्हणून काम केले आणि करते आहे. यामधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. शिवाय आपल्या फीटनेससाठी योगासनांच्या व्हिडिओ आणि सीडीसाठी शिल्पा प्रसिद्ध आहेच. कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात फारसे यश न मिळवलेल्या या अभिनेत्रीने नंतरच्या टप्प्यात मात्र चांगलेच यश आणि लोकप्रियता मिळवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी