Aryan khan: आर्यनच्याआधी शाहरूख खानवरही भारी पडले होते समीर वानखेडे

बी टाऊन
Updated Oct 27, 2021 | 17:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

sameer wankhede shahrukh khan: हेच ते समीर वानखेडे ज्यांनी १० वर्षापूर्वी शाहरूख खानलाही(shah rukh khan) कस्टम ड्युटी न भरल्याच्या आरोपाखाली पकडले होते. 

sameer wankhede
Aryan khan: आर्यनच्याआधी शाहरूख खानवरही भारी पडले होते समीर  
थोडं पण कामाचं
  • २०१०मध्ये समीर वानखेडे यांनी हॉलंड आणि लंडनमधून सुट्टी साजरी करून परतत असलेल्या शाहरूख खानला मुंबई एअरपोर्टवर रोखले होते.
  • शाहरूखकडे त्यावेळेस अशा अनेक परदेशी वस्तू होत्या ज्यावर कस्टम चार्ज लागला होता.
  • कस्टम चार्ज न भरल्यामुळे शाहरूखला अनेक तास एअरपोर्टवर बसवून चौकशी करण्यात आली होती.

मुंबई: स्टारकिड आर्यन खान(aryan khan) सध्या ड्रग्स केस प्रकरणात(drugs case) आर्थर रोड जेलमध्येआहे. आर्यनच्या केसची कमान नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(sameer wankhede) यांच्याकडे आहे. हेच ते समीर वानखेडे ज्यांनी १० वर्षापूर्वी शाहरूख खानलाही(shah rukh khan) कस्टम ड्युटी न भरल्याच्या आरोपाखाली पकडले होते. bollywood king shah rukh khan overshadowed by sameer wankhede

२०१०मध्ये समीर वानखेडे यांनी हॉलंड आणि लंडनमधून सुट्टी साजरी करून परतत असलेल्या शाहरूख खानला मुंबई एअरपोर्टवर रोखले होते. शाहरूखकडे त्यावेळेस अशा अनेक परदेशी वस्तू होत्या ज्यावर कस्टम चार्ज लागला होता. अभिनेत्याकडे २० बॅग्स होत्या ज्यातील अधिक सामानावर कस्टम चार्ज भरण्यात आला नव्हता. अशातच त्याला एअरपोर्टवरच थांबवण्यात आले होते. 

एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे तेव्हा एअरपोर्टवर कस्टम ऑफिसमध्ये असिस्टंट कमिश्नर म्हणून ड्युटी करत होते. कस्टम चार्ज न भरल्यामुळे शाहरूखला अनेक तास एअरपोर्टवर बसवून चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंंतर त्याला १.५ लाखांचा दंड भरावा लागला. 

यांच्याशीही समीर वानखेडेंनी घेतला होता पंगा

आर्यन खान आणि शाहरूख खान यांच्याशिवाय अनुष्का शेट्टीचीही समीर११ तास चौकशी करत होते. अभिनेत्रीकडे अनेक महाग दागिने होते ज्यामुळे तिला एअरपोर्टवर रोखण्यात आले होते. याआधी समीर यांनी दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, मिनिषा लांबा, रणबीर कपूर. मिका सिंह, बिपाशा बासू, विवेक ऑबेरॉय, अनुराग कश्यप, रिया चक्रवर्ती यांचीही चौकशी केली आहे.  

मनीऑर्डरच्या पैशातून आर्यन कॅन्टीनमध्ये जेवण करतो

त्याचवेळी, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानला तुरुंगात N956 क्रमांक मिळाला आहे. वास्तविक, तुरुंगात कोणालाही नावाने हाक मारली जात नाही परंतु त्याच्या नंबरने, अशा परिस्थितीत आर्यन खानला त्याचा कैदी क्रमांकही मिळाला आहे. त्याचबरोबर आर्यन खानला कारागृहात त्याच्या घरातून 4500 रुपयांची मनीऑर्डर मिळाली आहे, जेणेकरून तो कॅन्टीनमधून त्याचे आवडते जेवण करु शकेल.

आर्यनला तुरुंगातील जेवण आवडत नाही

आर्यनला तुरुंगाचे अन्न आवडत नाही. त्याचवेळी, असा दावा देखील करण्यात आला होता की आर्यनला जेलचे शौचालय खूपच गलिच्छ वाटत आहे, त्यामुळे तो अन्न खात नाही कारण त्याला पुन्हा पुन्हा वॉशरूममध्ये जावे लागत नाही. त्यामुळे तो तुरुंगात फक्त बिस्किटे खात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी