Box Office Report: बॉलिवूडने सहा महिन्यांत 200 कोटी रुपये गमावले, बॉक्स ऑफिसवर 1400 कोटी रुपये कमावले

बी टाऊन
Updated Jul 02, 2022 | 19:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Box Office Collection Report: 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत बॉलीवूडला 200 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. जाणून घ्या बॉक्स ऑफिससाठी 2022 चे पहिले सहा महिने कसे गेले.

Bollywood lost Rs 200 crore in six months, earning Rs 1400 crore at the box office
बॉलिवूडचा 6 महिन्यांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत बॉलिवूडचे 1600 कोटी रुपये पणाला लागले होते.
  • बॉलीवूडला बॉक्स ऑफिसवर पहिल्या सहा महिन्यांत 200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
  • काश्मीर फाइल्सने सर्वाधिक २५२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

Box Office Report 2022: 2020 चे अर्धे वर्ष संपले आहे. कोरोनानंतर 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी नवीन आशा घेऊन आले. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले अनेक चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाले. पण, पहिल्या सहा महिन्यांतही बॉक्स ऑफिसवर चित्रपटसृष्टीची निराशा झाली आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत बॉलीवूडचे 1600 कोटी रुपये पणाला लागले होते. त्यापैकी केवळ 1400 कोटी रुपये वसूल झाले आहेत.

विशेष म्हणजे 2022 च्या सुरुवातीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. यानंतर अनेक चित्रपटांच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली. या
नंतर फेब्रुवारीमध्ये आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला. गंगूबाई काठियावाडीचे कलेक्शन 209.25 कोटी होते. या चित्रपटाने भारतात 153.69 कोटींची कमाई केली होती. 
त्याच वेळी, मे महिन्यात काश्मीर फाइल्स आणि आरआरआर सिनेमाने खूप कमाई केली. काश्मीर फाइल्सने भारतीय बॉक्स ऑफिसवर 252 कोटी रुपयांची कमाई केली.

The Kashmir Files


हे मोठे सिनेमा फ्लॉप ठरले


2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसरले. अक्षय कुमारचे बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट चांगलेच फ्लॉप झाले. याशिवाय कंगना राणौतची धाकड, शाहिद कपूरची जर्सी, जॉन अब्राहमचा अटॅक हे सिनेमा फ्लॉप झाले. त्याचवेळी, ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला अजय देवगणचा रनवे 34, टायगर श्रॉफचा हिरोपंती 2 सुद्धा त्याची किंमत वसूल करू शकला नाही. द काश्मीर फाइल्सनंतर, कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्याचवेळी वरुण धवनचा जुग जुग जिओ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 

 

Bhool Bhulaiya 2


दाक्षिणात्य सिनेमांची जादू


2022 च्या पूर्वार्धात साऊथच्या चित्रपटांनी अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांना धूळ चारली. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 275 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 
KGF 2 हा 2022 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. KGF 2 च्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर 430 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बाहुबली 2 नंतर हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 


का वाढतेय दाक्षिणात्य सिनेमांची जादू? 

दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा बॉक्स ऑफिसवर वाढतोय. आणि त्यामागची काही विशेष कारणे असल्याचं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांचं मत आहे." प्रेक्षकांना आता बदल हवा आहे. तेचतेच चेहरे पाहून हिंदी सिनेमाचा प्रेक्षक कंटाळला आहे, आणि ती गरज दाक्षिणात्य सिनेमाचे हिरो पूर्ण करत आहेत. आणि दुसरं म्हणजे, 70 च्या दशकातले चित्रपटांमध्ये जसा मसाला होता, तसाच मसाला, मनोरंजन, आणि भव्यता या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, सिनेमातील संगीताच्या बाबतीत हे सिनेमा थोडे मार खात आहेत. ती बाजू नीट करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, सध्याचा तरुण वर्ग हा दाक्षिणात्य सिनेमांमकडे खेचला जात आहे. सोशल मीडिया हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. आणि त्याचा पुरेपूर फायदा दाक्षिणात्य सिनेमा उठवताना दिसत आहेत. त्यामुळे बॉलिवूडला आता दाक्षिणात्य सिनेमांची स्पर्धा आहे". 

त्यामुळे येणाऱ्या काळात बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य सिनेमा अशी स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. आणि स्पर्धा आली की वरचढ ठरण्यासाठी सिनेमांचा दर्जा उंचावतोच. येत्या सहा महिन्यांत बॉलीवूडचे सुमारे 2500 कोटी रुपये पणाला लागले आहेत. त्यामुळे आता 6 महिन्यात बॉलिवूड सिनेमा काय जादू दाखवतो, की पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेमा वरचढ ठरणार तेच पाहायचं.. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी