हॉलीवूड आणि बॉलीवूड म्हणतायेत 'गो कोरोना' : 'या' चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर

बी टाऊन
Updated May 23, 2021 | 17:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

हॉलीवूड आणि बॉलीवूड या दोन्ही चित्रपट उद्योगांना कोरोनाचा जबरदस्त दणका बसला आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असे अनेक बिग बगेट, मोठ्या कलाकारांचे चित्रपट यामुळे रखडले आहेत.

Bollywood & Hollywood Movies awaiting release
प्रदर्शनाची वाट पाहत असलेले बॉलीवूड आणि हॉलीवूडचे बिगबजेट चित्रपट 
थोडं पण कामाचं
  • बॉलीवूड आणि हॉलीवूडला कोरोनाचा मोठा आर्थिक फटका
  • बॉलीवूड आणि हॉलीवूडचे अनेक बिगबजेट चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत
  • आमिर खानपासून टॉम क्रुझपर्यत सर्वानाच कोरोना संपण्याची प्रतिक्षा

मुंबई: कोरोना महामारीमुळे (corona pandemic) निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाचा फटका सर्वच क्षेत्रांना (Bollywood Businesses) बसला आहे. चित्रपट आणि मनोरंजन जगताचीसुद्धा (Entertainment business) यातून सुटका झालेली नाही. हॉलीवूड (Hollywood) आणि बॉलीवूड (Bollywood) या दोन्ही चित्रपट उद्योगांना याचा जबरदस्त दणका बसला आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असे अनेक बिग बगेट (Big Budget Films), मोठ्या कलाकारांचे (Superstars of Bollywood) चित्रपट यामुळे रखडले आहेत. अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर (Release of Films) पडले आहे. आपल्या लाडकांच्या कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत, मात्र कोरोना महामारीमुळे (corona) आणि निर्बंधांमुळे (lockdown)चाहत्यांना चित्रपटगृहात जाणे शक्य नाही. तर चित्रपटगृहच उपलब्ध नसल्याने आणि प्रेक्षकसंख्या उपलब्ध नसल्याने मोठे स्टार्सदेखील हातावर हात धरून बसले आहेत. सर्वानाच कोरोना महामारीचे संकट कधी संपते याची वाट पाहावी लागते आहे. कोरोनाचे सावट(Corona second wave) दूर होऊन पुन्हा प्रेक्षक चित्रपटगृहात परतण्याच्या अपेक्षेने हे बिगबजेट चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. हॉलीवूड आणि बॉलीवूड या दोन्ही चित्रपट उद्योगांना मागील वर्षापासून प्रचंड मोठा आर्थिक फटका (Big financial loss) बसला आहे. मागील वर्षभरापासून प्रदर्शनाची वाट पाहत असलेल्या आणि रखडलेल्या काही मोठ्या चित्रपटांकडे एक दृष्टीक्षेप टाकूया.

रखडलेले बिगबजेट बॉलीवूड आणि हॉलीवूडचे चित्रपट :

लाल सिंग चढ्ढा (आमिरचा बहुचर्चित चित्रपट) (Laal Singh Chaddha) (Aamir Khan)


बॉलीवूडचा एक्का असलेल्या आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०२०च्या क्रिसमसमध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर त्याचे प्रदर्शन २०२१मध्ये पुढे ढकलण्यात आले होते. २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या एन्ट्रीने हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

नो टाईम टू डाय (हॉलीवूडचा बिगबजेट चित्रपट, जेम्स बॉंडच्या सेरीजमधील नवी फिल्म)


डॅनिएल क्रेगची मुख्य भूमिका असलेला हा हॉलीवूडचा मोठ्या बजेटचा चित्रपट. नो टाईम टू डाय या चित्रपटात डॅनिएल क्रेग एजेंट ००७ ची भूमिका करतो आहे. हॉलीवूडच्या प्रसिद्ध जेम्स बॉंड चित्रपटांच्या शृंखलेतीलच हा पुढचा चित्रपट आहे. जगभर जेम्स बॉंड चित्रपटांचे खूप मोठ्या संख्येने चाहते आहेत. ते नव्या जेम्स बॉंड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. ऑस्कर विजेता रॅमी मॅलेक यात खलनायतकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी कमालीचे औत्सुक्य असताना हा चित्रपट कोरोना महामारीमुळे रखडला आहे. याचे प्रदर्शन नक्की कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ब्रम्हास्त्र (बॉलीवूडचा बहुचर्चित चित्रपट) (Ranbir Kapoor and Alia Bhatt)


रणवीर कपूर आणि आलिया भट यांचा चित्रीकरण सुरू असतानाच चर्चेचा विषय झालेला हा चित्रपट. ही एक फॅंटसी फिल्म आहे. मात्र कोरोनामुळे या बिगबजेट चित्रपटाला आता प्रदर्शनाची वाट पाहावी लागते आहे.

८३ (बॉलीवूड फिल्म) (Ranveer Singh)


रणवीर सिंगची भूमिका असलेला हा चित्रपट भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

टॉप गन : मावेरिक (Tom Cruise)


टॉम क्रुझची भूमिाक असलेला हा चित्रपट रखडला आहे. या चित्रपटाचे निर्माते कोरोना महामारी संपण्याची वाट पाहत आहेत.

द बॅटमन


रॉबर्ट पॅटीनसनची भूमिका असलेला हा हॉलीवूडचा चित्रपट. बॅटमन सेरिज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागील वर्षभरापासून हा चित्रपट रखडला असून मार्च २०२२ मध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.

सुर्यवंशी (बॉलीवूडचा बहुचर्चित चित्रपट) (Sooryavanshi)(Akshay Kumar)


अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला हा बिगबजेट चित्रपट मागील वर्षीच मार्च महिन्यात प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र  मागील वर्षी मार्च महिन्यातच भारतात कोरोना महामारीचे संक्रमण वेगाने पसरण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. परिणामी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. अजूनही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही. अक्षय कुमार या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

डेथ ऑन द नाईल


केनेथ ब्रॅनाघ यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

एफ९


विन डिझेल आणि जॉन सिनाची भूमिका असलेला हा हॉलीवूडपट आधी मे २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

तख्त


करण जोहरचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची खूप चर्चा होती. यावर्षीच्या सुरूवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे हा चित्रपट रखडला आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी