Top Bollywood News: प्रभासच्या राधे-श्याम सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नोरा फतेहीचे नवे डान्स चॅलेंज तर टायगर श्रॉफच्या गणपत सिनेमाचं मोशन पोस्टर लॉन्च

बी टाऊन
Updated Dec 25, 2021 | 12:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Trending Bollywood News: राधे श्याम सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तर, टायगर श्रॉफच्या गणपत सिनेमाचे नवे मोशन पोस्टरही रिलीज झाले आहे. तर दुसरीकडे, नोरा फतेहीने नवे डान्स चॅलेंज दिले आहे

Radhe Shyam film trailer release Nora Fatehi Dance challenge
प्रभासच्या राधे-श्याम सिनेमाचा ट्रेलर रिलीज, टायगर श्रॉफच्या गणपत सिनेमाचं मोशन पोस्टर लॉन्च  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टायगर श्रॉफच्या गणपत चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.
  • प्रभासच्या राधे-श्याम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
  • नोरा फतेहीने 'नच मेरी रानी'च्या धर्तीवर नवीन डान्स चॅलेंज


Trending Bollywood News : वर्ष संपता संपता अनेक सिनेमांचे मोशन पोस्टर, ट्रेलर तर काही सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज झाले आहेत. टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या राधे श्याम या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 83 या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून रणवीर सिंगच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

'राधे श्याम'चा ट्रेलर रिलीज! प्रभास-पूजा हेगडेची सिझलिंग केमिस्ट्री


साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा मोस्ट अवेटेड 'राधे श्याम' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील प्रभास आणि पूजाच्या रोमँटिक केमिस्ट्रीचा अंदाज टीझरवरून आला असेलच. चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी, निर्मात्यांनी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत  एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या भव्य कार्यक्रमात, हा भव्य ट्रेलर 4000 लोकांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला, 

 

टायगर श्रॉफने शेअर केले नवीन चित्रपट 'गणपत'चे मोशन पोस्टर ! वर्षभरानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांची मेगा बजेट फिल्म 2022 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. विकास बहल दिग्दर्शित आणि पूजा एंटरटेनमेंट निर्मित 'गणपत' हा अॅक्शन सीक्वेन्स असलेला चित्रपट आहे.

हा चित्रपट 2022 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते,  परंतु आता टायगरने चित्रपटाच्या नवीन मोशन पोस्टरद्वारे चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.


नोरा फतेहीचे सोशल मीडियावर नवे चॅलेंज 

नोरा फतेही बॉलिवूडची आवडती डान्सर. तिनेअनेक चित्रपटात काम केले आहे. नोरा फतेही अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करते! यामुळे चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. त्यातच आता तिने नवे डान्स चॅलेंज केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Nora Fatehi (@norafatehi)


धर्मेंद्रने चाहत्यांना नवीन कोरोनाच्या व्हेरिएंटबद्दल सतर्क केले आहे

धर्मेंद्र यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे . ज्यामध्ये ते त्यांच्या फार्म हाऊसमध्ये आहेत. याशिवाय त्यांनी कोरोनाबाबत आपली प्रतिक्रियाही दिली आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची चिंता वाढली असून प्रशासनाकडून याबाबत कडक कारवाई करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी