Bollywood News: जेव्हा बच्चन कुटुंब होतं Corona च्या विळख्यात, फोन करून अजय देवगण संतापला होता अभिषेकवर आणि म्हणाला...

बी टाऊन
Updated Aug 07, 2022 | 15:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood Friends: अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) कोरोना काळातील एक आठवणी सांगितली जी विसरणं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला (Bachchan Family) खरंच कठीण आहे. जेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला तेव्हा अजय देवगणने (Ajay Devgn) त्याला फोन केला आणि असं काही सुनावलं की ते ऐकून अभिषेकची पुरती बोलतीच बंद झाली.

Bollywood Friends
जेव्हा अजय देवगण अभिषेक बच्चनवर संतापतो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजय देवगण अभिषेक बच्चनवर संतापला तेव्हा
  • बच्चन कुटुंब होतं कोरोनाच्या विळख्यात तेव्हा फोन करून अजय देवगण म्हणाला असं काही
  • बॉलिवूडची अशीही दोस्ती

Bollywood Friends : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn)  गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.  त्याच बरोबर अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) देखील बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अजय देवगण अभिषेक बच्चनचा सिनियर आहे, तरीही दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. एवढेच नाही तर अभिषेकने करिअरच्या सुरुवातीच्या काळात अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊसमध्येही काम केले होते. पण आज आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत, जेव्हा बच्चन कुटुंबाला (Bachchan Family) कोरोना झाला आणि अजय देवगण फोन करून अभिषेकवर संतापला. ( Bollywood news When Bachchan family had got corona Ajay Devgn called Abhishek )

अधिक वाचा : हे घरगुती मसाले औषध म्हणून वापरा, अनेक समस्यांवर उपाय

द कपिल शर्मा शोचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन अजय देवगणबद्दल एक किस्सा शेअर करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, अजय देवगणबद्दल बोलत असताना, अभिषेक एक किस्सा शेअर करत आहे जेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला होता. शो दरम्यान कपिल अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांना विचारतो की जेव्हा अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याची बातमी आली तेव्हा संपूर्ण देश निराश झाला, कारण ते आमचे आयकॉन आहेत. कपिल पुढे म्हणतो की, तुम्हालाही कोरोना झाला होता, अजय पाजींनी फोनही केला होता,त्याचं काय झालं?


'अजय देवगण नेहमीच सिंघम मोडमध्ये असतो'

यावर अभिषेक बच्चन उत्तर देत म्हणतो की, अजय देवगण प्रेमाने काहीही बोलत नाही, त्याचा स्वभाव नेहमीच सिंघम मोडमध्ये असतो. अभिषेकने पुढे सांगितले की, जेव्हा वडिलांना (Amitabh Bachchan) कोरोना (Corona) झाला तेव्हा मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करायला गेलो होतो. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुला पण कोरोना झालाय, तू पण इथेच थांब. त्यावेळी पहिला अजय देवगणचा फोन आला.

अधिक वाचा : आठवी,नववीची मुलं करत होती लग्न

अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याचा फोन उचलल्यानंतर मी स्वतःला विचारू लागलो की मी फोन का उचलला. अभिनेता स्पष्ट करतो की तुम्हाला नुकतेच कळले की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, आई-वडील, पत्नी आणि मूल सगळे घरी आहेत, हे सर्व तणावात होते आणि टेस्टचा रिपोर्ट काय येणार.अशा वेळी अजय देवगणचा फोन येतो आणि आज तो बहुधा प्रेमाने बोलेल असे वाटते, पण होतं नेमकं उलटं. अजय फोनवर ओरडतो - हे काय आहे ?, असं कसं झालं? .. हे काय झाले आहे?असे प्रश्न विचारले जातात की मला वाटले की मी हॉस्पिटलमध्ये नाही तर पोलिस स्टेशनमध्ये आहे... अभिषेक बच्चन पुढे असंही म्हणाला की अजय देवगण नेहमीच सिंघम मोडमध्ये असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी