Coronavirus: इटलीमध्ये फसलेल्या प्रसिद्ध गायिकेनं शेअर केला व्हिडिओ, देशवासियांना खास विनंती

बी टाऊन
Updated Mar 25, 2020 | 19:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Singer Shweta pandit in Italy: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आपल्या नवऱ्यासोबत इटलीमध्ये फसलेला आहे. मागील एक महिन्यापासून ती आपल्या घरातच बंद आहे.तिनं व्हिडिओ शेअर करत इटलीच्या परिस्थितीची माहिती दिली, जी भयावह आहे.

Singer Shweta Pandit
इटलीमध्ये १ महिन्यापासून फसलीय ही प्रसिद्ध गायिका  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात सुद्धा कोरोनानं आपले हात-पाय पसरणं सुरू केलंय आणि देशातील आकडेवारी सुद्धा वाढतेय. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधानांनी देशात संपूर्ण २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलंय. जनतेनं आपल्या घरातच राहावं आणि कोरोनापासून आपला बचाव करून घ्यावा, हा सल्ला सरकार देतांना दिसत आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत हजारोंच्या संख्येनं लोकांचा मृत्यू झालाय. चीननंतर सर्वाधिक प्रकोप बघायला मिळतोय तो इटलीमध्ये. आतापर्यंत इटली कोरोना व्हायरसमुळे ७ हजार लोकांचा जीव गेलाय. या दरम्यान, एक बातमी समोर आलीय बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्वेता पंडीत इटलीमध्ये फसलीय. श्वेतानं व्हिडिओ शेअर करत स्वत: याची माहिती दिलीय. गायिका श्वेतानं या व्हिडिओमध्ये इटलीतील वाईट परिस्थितीची माहिती दिलीय. तिनं सांगितलं की, मागील एक महिन्यापासून ती आपल्या घरातून बाहेर पडलेली नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#staysafe #stayhome #prayforitaly #italylockdown #indialockdown #jantacurfew

A post shared by SP (@shwetapandit7) on

गायिका श्वेता पंडितनं सांगितली इटलीची परिस्थिती

श्वेतानं या व्हिडिओमध्ये सांगितलं की, कोरोना व्हायरसला मस्करीत घेऊ नका, ही खूप गंभीर गोष्ट आहे. श्वेता म्हणते, ‘मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा फक्त अॅम्बुलंसचा आवाज येतो, मी खूप खंत व्यक्त करत ही गोष्ट सांगतेय.’ अनेक लोकांनी मला फोन केला. मी सर्वांना सांगू इच्छिते मी ठीक आहे, आपल्या घरातच कुटुंबियांसोबत आहे.

भारतात अशी परिस्थिती उत्पन्न होऊ नये

श्वेतानं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, अनेक मोठ-मोठे देश कोरोनाच्या कचाट्यात सापडलेत. अमेरिका, लंडन सारख्या देशांनंतर आता भारतात कोरोना दाखल झालाय. श्वेता म्हणते, अनेकांनी मला विचारलं की, कोरोना इटलीपर्यंत कसा पोहोचला. तर मी सांगू इच्छिते मला सुद्धा याबाबत अधिक माहिती नाही. जोपर्यंत आमच्या हे लक्षात आलं, याबाबत माहिती मिळाली तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती. कोरोना अनेक लोकांमध्ये पसरला होता. मला वाटतं भारतात असं घडू नये.

भारतात परतणार होती श्वेता

श्वेतानं सांगितलं की, होळीच्या निमित्तानं ती भारतात येणार होती. मात्र मी असं केलं नाही कारण मला वाटत होतं की कोरोनाची लागण मला व्हावी आणि नंतर भारतात माझ्यामुळे दुसऱ्या कुणाला याची लागण व्हावी. श्वेता म्हणते, ‘आपण सगळ्यांनी याच्याशी लढा द्यायला हवा. घरातच राहा, हात वारंवार धुवावेत, कुटुंबियांसोबतही दुरून बोला, घरात राहूनच काही वाचा, संगीत ऐका आणि आरामही करा. सुरक्षित राहा.’

श्वेता पंडितनं ‘मोहब्बते’ चित्रपटात अनेक गाणी गायली आहे. ज्यात पैरों में बंधन है, आँखे खुली, सोनी सोनी अखियो वाले, चलते चलते सारख्या गाण्यांचा समावेश आहे. याशिवाय श्वेता पंडितनं पार्टनर चित्रपटातील यू आर माय लव्ह, मेरे ब्रदर की दुल्हन चित्रपटातील दो धारी तलवार सह अनेक गाणी गायली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी