'हेराफेरी'चे निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या घरावर एनसीबीचा छापा, पत्नीला अटक

Bollywood producer Firoz Nadiadwala's residence raided by NCB एनसीबीने निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापा टाकला. ड्रग सापडल्यानंतर नाडियाडवालांच्या पत्नीला अटक करण्यात आली.

Bollywood producer Firoz Nadiadwala's residence raided by NCB
निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या घरावर NCBचा छापा 

थोडं पण कामाचं

  • 'हेराफेरी'चे निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या घरावर एनसीबीचा छापा
  • ट‌ॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता
  • मुंबई महानगर प्रदेशात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे छापे

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) ड्रग केस (Drug Case) प्रकरणी मुंबईत बॉलिवूडचे फिल्म निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापा टाकला. एनसीबीने नाडियाडवालांच्या पत्नीची चौकशी केली. नाडियाडवालांच्या घरात ड्रगचा मर्यादीत साठा जप्त झाला. या प्रकरणात चौकशीअंती फिरोज नाडियाडवालांच्या पत्नीला अटक करण्यात आली.  (Bollywood producer Firoz Nadiadwala's residence raided by NCB)

छापा टाकण्यात आला त्यावेळी निर्माते फिरोज नाडियाडवाल घरात नव्हते. फिरोज नाडियाडवाल यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीसाठी हेराफेरी, फिर हेराफेरी, आवारा पागल दिवाना, मनी वेलकम, फूल अँड फायनल या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. 

मागील काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधूनमधून ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोन (Actress Deepika Padukone) हिची ट‌ॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) हिने अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला ड्रग प्रकरणात करिश्माविषयी संशय वाटत आहे. करिश्मा तिच्याकडे असलेली महत्त्वाची माहिती लपवत असल्याची शक्यता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने व्यक्त केली आहे. काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अचानक करिश्माने आपण क्वान या टॅलेंट एजन्सीतील नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती माध्यमांना मिळेल अशी व्यवस्था केली होती. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला पण अटक केली. 

सध्या रियासह काही आरोपी सशर्त जामिनावर आहेत. रियाचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) अद्याप ड्रग केसमध्ये जेलमध्येच आहे. एनसीबीने ड्रग प्रकरणी बॉलिवूडच्या (Bollywood) काही दिग्गजांची चौकशी केली. यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) या अभिनेत्रींचा (Famous Actress) समावेश आहे. टॅलेंट मॅनजेर करिश्मा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी तसेच फॅशन डिझायनर (fashion designer) सिमॉन खंबाटा (Simone Khambatta) यांचीही चौकशी झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंधेरीतील वर्सोवा भागात छापा टाकला. छापा टाकून फैझल नावाची व्यक्ती टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिला ९९ ग्रॅम गांजा विकत असताना अटकेची कारवाई करण्यात आली. वर्सोवा येथील मच्छीमार कॉलनीत ही कारवाई झाली. फैझल (Faisal) आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) यांना अटक झाली. न्यायालयाने फैझल आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान या दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. प्रीतिका चौहानने काही वर्षांपूर्वी संकटमोचन महाबली हनुमान (Sankatmochan Mahabali Hanuman) या टीव्ही मालिकेत तसेच झमेला (Jhamela) या सिनेमात अभिनय केला आहे.

याआधी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) हिच्या भावाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गिसिलाओस (Agisilaos Demetriades) असे असून तो मूळचा आफ्रिकेचा नागरिक असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली. सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीतून सुरू झालेल्या ड्रग केसमध्ये एका पेडलरने गिसिलाओस याचे नाव घेतले होते. या संदर्भात आणखी ठोस माहिती हाती आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. गिसिलाओस ड्रगचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये अतिशय अॅक्टिव्ह आणि महत्त्वाचा दुवा आहे. तो थेट ड्रग पेडलरच्या संपर्कात होता. याच कारणामुळे त्याला ठोस माहितीच्या आधारे अटक करण्यात आली, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले. ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग जप्त करण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील, असेही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई महानगर प्रदेशात प्रामुख्याने मालाड, अंधेरी, खारघर आणि कोपरखैरणे या भागांमध्ये वारंवार छापे टाकत आहे. अंधेरीत लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि वर्सोवा या भागांतील हालचाली तसेच मालाडच्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागांतील हालचालींवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी